श्रीलंकन सरकारमध्ये राजपक्षे कुटुंबाचा वरचष्मा

    दिनांक :12-Aug-2020
|
- 28 कॅबिनेट मंत्र्यांचा झाला शपथविधी
कोलंबो,
श्रीलंकेत आज बुधवारी पंतप्रधान मिंहदा राजपक्षे यांच्या नेतृत्वात नवे सरकार सत्तारूढ झाले. राष्ट्राध्यक्ष गोटाबाय राजपक्षे यांनी पंतप्रधान राजपक्षे आणि 28 कॅबिनेट मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. विशेष म्हणजे, या नव्या सरकारमध्ये राजपक्षे कुटुंबीयांचाच वरचष्मा दिसून आला आहे. त्यांच्या परिवारातील चार सदस्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले.
 
 

Minhada Rajapakse_1  
 
राष्ट्राध्यक्ष गोतबाया यांनी महत्त्वाचे संरक्षण खाते स्वत:कडे ठेवले असून, अर्थ मंत्रालय पंतप्रधानांकडे सोपविण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत राजपक्षे यांच्या यांच्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले होते.
 
 
राष्ट्राध्यक्षांनी 28 कॅबिनेट मंत्र्यांना शपथ दिल्यानंतर लगेच 40 राज्यमंत्र्यांची नियुक्तीही केली. यापूर्वीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्र्यांची संख्या 30 होती.
 
पंतप्रधान राजपक्षे यांनी स्वत:कडे अर्थ खात्यासोबतच नगर विकास आणि बुद्धिस्ट व्यवहार हे महत्त्वाचे खातेही ठेवले आहे. मिंहदा यांचा मोठा मुलगा नमल राजपक्षे यांच्याकडे युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 2010 मध्ये राजकारणात आल्यानंतर त्यांना प्रथमच कॅबिनेट मंत्री बनविण्यात आले आहे.