कृष्ण पाळण्याचा आवाजच नाही!

    दिनांक :12-Aug-2020
|
- घरातच झाली पूजा, महाप्रसादही नाही
तभा वृत्तसेवा
हिंगणघाट,
कोरोनाच्या सावटामुळे येथील सर्व कृष्णमंदिरात सामसुम दिसुन आली. जन्माष्टमीच्या मुहूर्तावर भगवान कृष्णाच्या मुर्तीची घरोखरी प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. जन्माष्टमीच्या मुहूर्तावर आज सर्वत्र स्नेहभोज आयोजित करुन महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. पण यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे भाविकभक्त या महाप्रसादाला मुकले आहे. यावेळी फक्त पुजाअर्चा, भजन पुजन करुनच जन्माष्टमी साजरी करण्यात आली असल्याचे दिसुन येत आहे.
 
 
warki_1  H x W:
 
आज शहरातील देवेंद्र बोरकर यांचे मोदक लॉन येथील राधा-श्यामसुंदर मंदिरात विठ्ठल दानव, अरुण सुरजुसे यांच्या चमुने भजनसंध्येचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील ग्रामीण भागातसुद्धा कृष्णमूर्तीची स्थापना करुन जन्माष्टमी अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली.