ब्रॉडगेजसाठी धारणी बंदचा इशारा

    दिनांक :12-Aug-2020
|
-माजी आ. भिलावेकर यांची घोषणा
तभा वृत्तसेवा
धारणी,
अकोला-खंडवा ब्रॉडगेज रेल्वे लाईन जुन्या मीटरगेज मार्गाने म्हणजे मेळघाटाच्या रेल्वे धुळघाट-डाबका मार्गानेच विस्तारीत करावी अन्यथा एका आठवड्यानंतर धारणी बंद करुन शासन तथा रेल्वे मेळघाटातून पळविण्याचे प्रयत्न करणार्‍यांना शक्ती दाखविली जाईल, असा कडक इशारा माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी दिल्याने भाजपा-शिवसेना आमने सामने आलेले आहे.
 
dharni band_1  
भाजपाचे धारणी तालुकाध्यक्ष हिरालाल मावस्कर यांचे उपस्थितीत माजी आ. प्रभुदास भिलावेकर यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. मिताली सेठी यांना दिलेल्या लेखी पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. नायब तहसीलदार आदिनाथ गाजरे यांनी भाजपच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्विकारले.
 
वन्यजीव मंडळाच्या सभेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अभिनंदनाचापण भिलावेकर यांनी खरपूस समाचार घेताना मेळघाटच्या आदिवासींच्या मुलभूत वहिवाटी हक्कावर गदा आणणार्‍या शासनाविरुध्द आंदोलन उभारण्याचे सांगितले. जुन्या मीटरगेजच्या मार्गाने ब्रॉडगेज करुन शासनाचा 29 किमीचा नवीन मार्गावरील कोट्यवधी रुपयाचा निधीपण वाचवावा तर दक्षिण भारतातून मध्य व उत्तर भारतात जाणार्‍या प्रवाश्यांचा वेळ व पैसा सुध्दा वाचवावा, असे भिलावेकर यांनी प्रतिनिधी सोबत बोलताना केंद्रीय मंत्री जावडेकरांनी केलेली शिफारस राज्य सरकारने मानावी, असा सल्ला ठाकरे शासनाला दिलेला आहे. या विषयावर आठ दिवसाचे आत निर्णय घ्यावा, तसे न केल्यास धारणी बंद करण्यात येईल. आमच्या भावना तात्काळ मुख्यमंत्री ठाकरे यांचेकडे पाठवाव्या, असे भिलावेकर यांनी सांगितले.