कोरोनाबाधितांचे शतकानंतर दिड शतक

    दिनांक :12-Aug-2020
|
-149 रुग्ण कोरोनामुक्त
-दोन रुग्णांचा मृत्यू
तभा वृत्तसेवा
अमरावती,
अमरावती जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाबाधितांचे शतक झाल्यानंतर बुधवारी बाधितांचे दिड शतक झाले. दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून 149 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 3 हजार 237 कोरोनाग्रस्त झाले आहे.

corona_1  H x W 
त्यापैकी 1096 रुग्ण क्रियाशील असून त्यातील 21 रुग्णांना नागपूरात हलविण्यात आले आहे. आतापर्यंत 92 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत 2203 रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.
 
जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मोथा, नांदगावपेठ, दयासागर रूग्णालय परिसर, रामपुरी कॅम्प, वृंदावन कॉलनी, कृष्णानगर, सरस्वतीनगर, अंबापेठ, केवल कॉलनी रहाटगाव रोड, सिंधी चौक, द्वारकानाथ कॉलनी, नया अकोला, बेलपुरा, अमरनगर, यशोदा नगर, दस्तूर नगर, वडाळी, अचलपूर, सेंट्रल जेल परिसर अमरावती, साईनगर, विलासनगर, विश्वप्रभा कॉलनी, नवी वस्ती बडनेरा, जेवडनगर,
 
महालक्ष्मी नगर, फ्रेजरपूरा, जयस्तंभ चौक, विश्वप्रभा कॉलनी, समर्थ कॉलनी मोर्शी, स्वप्नश्री कॉलनी, भातकुली, शिरजगाव, खेलदेवफाली ता. चिखलदरा, बनोसा दर्यापूर, शिरखेड, वलगाव, अंजनगाव सुर्जी, करजगाव, पथ्रोट, दर्यापूर, मलकापूर धामोरी, जीवनपूरा अचलपूर, मालखेडा ता. वरुड, शेंदूरजना घाट वरुड या व अन्य भागातील रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे अहवालातून समोर आले आहे. या नवीन 154 रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे थ्रोट स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
 
कारागृहातील 24 बाधित
अमरावती मध्यवर्ती कारागृहातील 24 बंदीजनांना कोरोनाची लागण झाली आहे. यापुर्वीही काही बंदीजन बाधित झाले होते.
दोन रुग्णांचा मृत्यू 
कोविड रुग्णालया उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांचा बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यात वडाळी येथील 60 वर्षीय महिलेचा तर समर्थ कॉलनी येथील 57 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.
 
मालक व कर्मचार्‍यांना चाचणी बंधनकारक
अमरावती महानगर पालिका हद्दीतील ज्या आस्थापना धारकाकडे 10 पेक्षा जास्त कर्मचारी /कामगार कार्यरत आहे, त्यांना आपले कर्मचारी /कामगार व स्वतः ची कोरोना चाचणी करून घेण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. चाचणीचा अहवाल महानगरपालिकेला दोन दिवसाच्या आत सादर करणे अनिवार्य आहे. अन्यथा महानगरपालिकेद्वारा आस्थापना सिल बंद करण्यात येणार आहे, असे मनपा प्रशासनाने कळविले आहे.