बाबराचे मानसपुत्र...

    दिनांक :12-Aug-2020
|
 राष्ट्रचिंतन
 - उमेश उपाध्याय
अयोध्येशी माझा संबंध फार जुना आहे. लहानपणापासूनच आईवडील वर्षातून किमान दोन वेळा अयोध्येला जात असत. त्यांचे गुरू स्वामी रामहर्षणदास यांचा आश्रम तिथेच आहे. गेल्या 50-55 वर्षांपासून त्यांचा हा क्रम नियमित सुरू आहे. त्या वेळी विश्व िंहदू परिषदेच्या रामजन्मभूमी आंदोलनाची सुरवातही झालेली नव्हती. अयोध्येत जन्मस्थानावर राममंदिर बनावे, ही माझ्या आईवडिलांची नेहमीच उत्कट इच्छा राहिली. खरे म्हणजे, कुठल्याही राजकीय उद्देशाशिवाय अयोध्येत जन्मभूमीवर रामललाचे भव्य मंदिर बघण्याची आस असणार्‍या त्या कोट्यवधी रामभक्तांचे प्रतिनिधित्व, माझे आईवडील करीत होते.

babar _1  H x W 
 
गेल्या काही दिवसांत परदेशातील वृत्तपत्रांमध्ये अनेक लेख प्रकाशित झालेत. त्यात अयोध्येच्या घटनेला, भाजपाच्या नेतृत्वात ‘िंहदू राष्ट्रवाद्यांद्वारे मंदिरनिर्माणा’ला एक राजकीय पाऊल म्हटले गेले आहे. असे लिहिणारे फार मोठी चूक करीत आहेत. याला केवळ राजकीय आंदोलन म्हणणे, याचे फारच उथळ विश्लेषण आहे. रामजन्मभूमीसाठी झालेला संघर्ष कुठले राजकीय आंदोलन नव्हते. अनवरत काही शे वर्षे चालू शकेल, इतकी शक्ती कुठल्याही राजकीय आंदोलनात नसते. िंहदूंच्या मनात राममंदिरनिर्माणाची आकांक्षा आणि त्यासाठीचा संघर्ष तर सुमारे 500 वर्षांपासून सुरू आहे. मंदिरनिर्माण सुरू होण्याच्या कार्यक्रमाला एका संकुचित राजकीय परिघात बघणारे हे लोक वैचारिक भ्रमाचे बळी आहेत.
 
माझे वडील राजकीय नव्हते. ते रेल्वेत काम करायचे. त्यांचा राजकीय विचारधारा अथवा कुठल्याही राजकीय पक्षाशी काहीच संबंध नव्हता. परंतु, अनन्य रामभक्त असल्याने रामजन्मभूमीवर त्यांची अतूट श्रद्धा होती. त्यांच्यासारख्याच कोट्यवधी रामभक्तांनी, अयोध्येत रामजन्मभूमीवर गौरवमय मंदिर व्हावे, या मनोरथात अनेक शतकांपासून आयुष्य व्यतीत केले आहे. त्यावेळेपर्यंत भाजपाचा पूर्वावतार भारतीय जनसंघ तसेच रा. स्व. संघाचा उत्तरप्रदेशात विशेष प्रभाव नव्हता. उलट, 60-70च्या दशकात तर उत्तरप्रदेशात कॉंग्रेसशिवाय समाजवादी आंदोलनाची पकड कितीतरी अधिक मजबूत होती. मला आठवते की, मी लहान होतो तेव्हा माझ्या मोठ्या भावाने, आगरा कॉलेजात विद्यार्थी संघाची निवडणूक समाजवादी युवजन सभेचा उमेदवार म्हणून लढविली होती. परंतु, त्यांच्यात रामभक्त असणे आणि समाजवादी असणे यात कुठलेही द्वंद्व नव्हते. या बारकाव्याला राजकीय िंचतक आणि राजकीय लेखकांनी समजून घेणे आवश्यक आहे.
 
तुम्ही राममंदिर आंदोलनाला केवळ एका राजकीय पक्ष अथवा विचारधारेच्या दृष्टीने बघाल, तर तुमच्या आकलनात चूक होणारच. लोकांच्या मनात काय चालले आहे, हे समजून न घेण्याची चूक, विशेषत: 80-90च्या दशकात आणि त्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्यांनी व वामपंथी बुद्धिजीवींनी केली. विशेषत: उत्तरप्रदेश व भारताच्या फार मोठ्या क्षेत्रात वास्तवात काय होत आहे, याला ते समजूच शकले नाहीत. जनभावनांचे उथळ आकलन आणि स्वत:च्या ‘सेक्युलर’ पूर्वग्रहामुळे त्यांनी प्रत्येक रामभक्ताला ‘संघी’ घोषित करून टाकले. िंचतनावर राजकीय स्वार्थ बलवत्तर झाला की नीर-क्षीर विवेकाची साथ सुटते.
 
मुळापासून तुटलेल्या या कथित िंचतक, विचारक, मीडिया आणि बुद्धिजीवींना, त्यांचा हा मतिभ्रम केव्हा िंहदुविरोधी मानसिकतेत बदलला, हे कळलेच नाही. आजही जेव्हा मोदी-समर्थकांना ‘भक्त’ म्हणत शिव्या दिल्या जातात, तेव्हा आपल्या ‘श्रेष्ठ बौद्धिकते’च्या अहंकारात जगणारे हे लोक तीच चूक पुन्हा करीत असतात. याचा परिणाम काय झाला? राजकीय नसलेले माझे वडील, 90चे दशक येईपर्यंत पूर्णपणे भाजपा व संघसमर्थक झालेत. त्यांना वाटले की, त्यांचे आराध्य भगवान रामाच्या न्यायोचित मंदिराचे निर्माण केवळ आणि केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यापासून प्रेरित संघटनांचे लोकच करू शकतात. संघ कार्यकर्त्यांच्या समर्पण, निष्ठा, त्यागाचे माझ्या वडिलांसारखे लोक मुरीद बनले.
रामजन्मभूमीच्या उद्धारासाठीचा संघर्ष प्रदीर्घ चालला. बाबरचा सेनापती मीर बाकीने तिथे मंदिर उद्ध्वस्त करून मशीद बांधली तेव्हापासून रामभक्त कधीही स्वस्थ बसले नाहीत. असे म्हणतात की, मंदिर 1526 मध्ये तोडण्यात आले. तेव्हापासूनच अयोध्या अगणित संघर्षांची गाथा बनली आहे. संघर्ष कधी थांबला नाही. आपल्या आराध्य देवतेच्या मंदिराचा, तलवारीच्या धाकावर झालेल्या या क्रूर विध्वंसाला सामान्य समाजाने कधीही स्वीकारले नाही. एखादा समाज आपल्या न्यायोचित अधिकारांसाठी 500 वर्षांपर्यंत संघर्ष करीत राहिला, ही एक अद्भुत घटना आहे. या दरम्यान इस्लाम मानणार्‍या परदेशी आक्रमकांचे राज्य राहिले. त्यांनी नेहमीच पाशवी क्रूरता आणि असहिष्णूतेने िंहदूंच्या समस्त अधिकारांवर निर्दयपणे अतिक्रमण केले. नंतर ख्रिस्तीधर्मीय इंग्रजांचे राज्य राहिले. अत्याधिक दडपशाही, भीती, बळजबरी आणि प्रलोभनाच्या या अंधकारमय वातावरणातही, पाच शतकांपर्यंत आमच्या समाजाने परधर्मी आक्रमकांचा प्रतिकार केला. जगाच्या इतिहासात अशी दुसरी घटना सापडत नाही.
असे म्हणतात की, 50 वर्षांच्या काळात चार पिढ्या जातात. मग या 500 वर्षांमध्ये चाळीसेक पिढ्या झाल्याच असतील. या पिढ्यांमध्ये प्रत्येक पिढीने दुसर्‍या पिढीला या संघर्षाची चेतना वारशाच्या रूपात सोपविली. एक पिढी दुसर्‍या पिढीला सांगत गेली की, रामाची भूमी अयोध्याच आहे. म्हणून ज्या परधर्मी आक्रमकांनी बळजबरीने रामाची जन्मभूमी त्याच्या भक्तांपासून हिसकली आहे, तिच्यासाठी संघर्ष करणे त्यांचे धार्मिक, नैतिक, सामाजिक आणि राष्ट्रीय दायित्व आहे. या अर्थाने रामजन्मभूमी मंदिराचे निर्माणकार्य सुरू होणे केवळ एक धार्मिक घटना नाही, तर ती सामूहिक राष्ट्रीय चेतनेचे निरंतर संग्रहण व सिंचनाचे प्रतीक आहे. हे त्या अनवरत चालणार्‍या संघर्षाच्या ज्योतीचे प्रतीक आहे, जी कोट्यवधींच्या हृदयात सतत तेवत होती.
5 ऑगस्टच्या घटनेला सीमित, संकुचित राजकीय आणि धार्मिक दृष्टीने बघणारे पुन्हा एकदा घोडचूक करीत आहेत. त्यांना हा समाज आणि त्यात व्याप्त चेतना लक्षातच येत नाही आहे. अयोध्येचा समारोह भारतीय समाजाची जिजीविषा, समृद्ध वारशाप्रती त्याचे समर्पण, त्याचे शाश्वत संकल्प, साधनहीन असतानाही संघर्ष करण्याचे मनोबल आणि अत्यंत विपरीत परिस्थितीत न चुकलेल्या त्याच्या धैर्याचे प्रतीक आहे.
या राष्ट्रीय सामाजिक चेतनेची ज्वाळा निरंतर प्रज्वलित ठेवण्यात एका महानायकाची फार मोठी भूमिका होती. ते होते गोस्वामी तुलसीदास. तुलसीदास रामचरितमानस लिहूनच थांबले नाहीत, तर त्यांनी रामलीलादेखील सादर करणे सुरू केले. गरीब, श्रीमंत, प्रत्येक जातिवर्ग, विद्वान, अशिक्षित, स्त्री आणि पुरुष सर्वांपर्यंत तुलसीदासांनी अनुपम रामकथेद्वारा या चेतनेला पोहचविले. रामलीला आणि रामचरितमानस या संघर्षाच्या अंत:चेतनेचा कणा आहे. या नाते गोस्वामी तुलसीदास रामजन्मभूमी पुनर्निर्माणाचे वैचारिक प्रणेताच नाही, तर पहिले आंदोलकदेखील आहेत. आज देशाच्या कणाकणांत राम वसले आहेत, ती गोस्वामी तुलसीदासांची देण आहे.
ज्या वेळी इस्लामी जिहाद आणि क्रूसेडचे वादळ सुरू झाले, तेव्हा मध्यपूर्व आशिया ते सुदूर पूर्वेपर्यंत एकापाठोपाठ एकेक देश, संस्कृती आणि प्राचीन सभ्यता परास्त होत समूळ परिवर्तित अथवा नष्ट होत गेली. परंतु, विदेशी आक्रमक आपल्या भरपूर प्रयत्नांनंतरही भारतात असे करू शकले नाहीत. भारतीय समाजाच्या अंत:चेतनेत जे सांस्कृतिक आणि परंपरांचे मूल्य प्रस्थापित झाले होते, ते इतके सघन, शुद्ध आणि सखोल होते की तलवारीचे भय, प्रलोभन आणि इतर कुठलीही लालूच त्यांना बदलवू शकली नाही. या प्रचंड वादळाने काही वृक्षांना जरूर झुकविले, काही फांद्यांना तोडले, काही फुलं चिरडली गेली आणि अगणित कळ्यांना कुस्करण्यात आले, परंतु भारतीय सभ्यतेचे संपूर्ण उद्यान कधी विराण झाले नाही. अयोध्येत रामजन्मभूमी मंदिराचे निर्माणकार्य सुरू होणे, आम्हाला हेच सांगत आहे.
रामचरितमानसमध्ये एक वर्णन आहे. राम आणि रावण युद्धासाठी समोरासमोर उभे झाले तेव्हा विभीषणाने पाहिले की राम पायदळ आणि अनवाणी आहे, परंतु महाबलशाली रावण रथावर स्वार आहे. तुलसीदास लिहितात-
रावनु रथी बिरथ रघुवीरा, देखि बिभीषन भयउँ अधीरा।
विभीषण रामाला विचारतो की तुम्ही अनवाणी, रथहीन असताना दहमुखी आणि वीस भुजांच्या रावणाला कसे िंजकाल? तेव्हा राम ज्या धोरणाचे वर्णन करतात, ते आजही तितकेच औचित्याचे आहे. भगवान राम म्हणतात की, युद्ध केवळ शस्त्रास्त्रांनी िंजकले जात नाही. ज्याच्याकडे धर्म, नीती, सत्यावर श्रद्धा आणि विवेकपूर्ण आचरणाचा रथ असतो, तो युद्धदेखील िंजकतो. श्रीराम म्हणतात-
महा अजय संसार रिपु, जीति सकइ सो बीर।
जाके अस रथ होइ दृढ, सुनहूं सखा मतिधीर।।
भगवान रामाची ही उक्ती, रामजन्मभूमीसाठी िंहदूंनी केलेल्या संघर्षालाही लागू होते. ना त्यांनी धर्म सोडला, ना आशा सोडली आणि ना ही संघर्ष सोडला. म्हणूनच 500 वर्षांनंतर रामजन्मभूमीवर मंदिरनिर्माणाचा प्रारंभ म्हणजे, कोट्यवधी भारतीयांनी शतकानुशतके, पिढी दर पिढी, सातत्याने, धैर्यपूर्वक उराशी बाळगलेल्या त्या राष्ट्रीय स्वप्नाची पूर्ती आहे. सामाजिक आणि राष्ट्रीय जागरणाचे हे आंदोलन समाजाची सामूहिक चेतना, त्याची अस्मिता, त्याचा मानसन्मान, आत्मभान याचा संकल्प आहे.
हे राष्ट्रीय अनुष्ठान अद्याप पूर्ण झालेले नाही. ज्या अनुदारवादी आणि असहिष्णू विचारांनी मध्यकाळात मंदिरे तोडून मशिदी बनविल्या होत्या, त्याच्या प्रतिकृती आजही जिवंत आहेत. खरेतर, 1947 नंतर इस्लामच्या अनुयायांनी म्हटले असते की, राम तुमचे इष्ट आहेत. मीर बाकी आणि बाबर विदेशी आक्रमक होते तसेच इस्लाममध्ये पूजनीयही नव्हते. म्हणून तुम्ही तुमच्या इष्टदेवाचे मंदिर बांधा, तर फार योग्य झाले असते. स्वातंत्र्यानंतर लगेच ही जमीन राममंदिर बांधण्यासाठी सोपविली असती, तर किती चांगले झाले असते? परंतु राजकीय स्वार्थ, छद्म सेक्युलरवाल्यांच्या माकडचेष्टा आणि इतिहासकार म्हणून प्रचारित वामपंथी बुद्धिजीवी चळवळ्या लोकांनी असे होऊ दिले नाही.
एका प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एकमताने मंदिराच्या बाजूने 2019 च्या नोव्हेंबर महिन्यात निर्णय दिला. त्यानुसार मंदिरनिर्माणाचे कार्य सुरू झाले आहे. आताही जे याचा विरोध करीत आहेत. ते ना भारताच्या संविधानावर, ना भारताच्या न्यायिक व्यवस्थेवर आणि ना ही कुठल्या नैतिकतेवर विश्वास ठेवणारे आहेत. ज्यांनी मंदिरच नाही, तर मध्यकाळात भारताच्या आत्म्यालाही चिरडण्याचा असफल प्रयत्न केला त्या शक्तींचे हे मानसपुत्र आहेत. पप
र्र्ीीर्.ीरिवहूरूऽसारळश्र.लेा