यवतमाळ जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढता

    दिनांक :12-Aug-2020
|
बिनधास्त वागणे सोडा : जिल्हाधिकाèयांचे आवाहन
* जिल्हा मृत्युदर २.६८ टक्के
* बरे होण्याचा दर ६३ टक्के
* कोरोना रुग्णदर ७.७ टक्के
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गत चार दिवसांत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या रोज शंभरी पार करीत आहे. शासनाच्या धोरणानुसार आपण ‘अनलॉकङ्क प्रक्रियेमध्ये असलो तरी नागरिकांनी जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. मात्र नागरिकांना कोरोनाच्या प्रादुर्भावाचे अजूनही गांभीर्य नाही. त्यामुळे स्वत:साठी आणि आपल्या कुटुंबासाठी आतातरी बिनाधास्त वागणे सोडा, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांनी केले.
 
devandr sinh_1  
जिल्ह्यातील कोरोनाविषयक माहिती देण्यासाठी बुधवार, १२ ऑगस्ट रोजी नियोजन भवनात पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधीक्षक मेघनादन राजकुमार, अपर जिल्हाधिकारी सुनील मqहद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललित वèहाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. qसह, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण उपस्थित होते.
 
जिल्ह्यात गृह विलगीकरण सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत ४४ जणांना ही सुविधा देण्यात आली असून यासंबंधी शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. लक्षणे नसली तरी पहिले दोन दिवस कोव्हिड दक्षता केंद्रामध्ये तपासणी केली जाते. गृहविलगीकरण हवे असणाèया व्यक्तीच्या घरी चार स्वतंत्र खोल्या, स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था आवश्यक आहे. पल्स ऑक्सिमिटर त्याने स्वत: विकत घेऊन स्वत:चे एसपीओटू चेक करावे व डॉक्टरांना त्याबाबत अवगत करावे.
 
कोरोनासंदर्भात खाजगी रुग्णालय, तसेच दुसèया जिल्ह्यात उपचाराची सुविधा शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार देण्यात येत आहे. खाजगी डॉक्टरांवर सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण तपासण्यासंबंधी प्रशासनाकडून कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. अ‍ॅन्टीजन किटसाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी २ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यात जिल्ह्यासाठी ३२५०० किट खरेदी करण्यात आल्या असून आणखी ३० हजार किट खरेदी करण्याला मंजुरी देण्यात आल्याचे जिल्हाधिकाèयांनी सांगितले.
गेल्या १० मार्च २०२० रोजी जिल्ह्यात सर्वात प्रथम कोरोना रुग्ण आढळले होते. आज ही संख्या १८६५ वर गेली आहे. यापैकी १२५० जण बरे होऊन घरी गेले आहेत. यात ७०७ पुरुष आणि ५४३ महिला आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ५७९ आणि इतर जिल्ह्यांतील ५ असे एकूण ५८४ कोरोनाग्रस्त उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सिंह  यांनी दिली.
 
सुरवातीच्या अडीच महिन्यात म्हणजे २९ मे पर्यंत पहिल्या १५० ते १६० रुग्णांमध्ये जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. आज मात्र जिल्ह्यात मृत्युचा आकडा ५० असून त्यात ३२ पुरुष आणि १८ महिला आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सारीचे ५८१ रुग्ण भरती झाले असून यापैकी ५६ कोरोनाग्रस्त निघाले आहेत. सारी आणि कोरोना दोन्ही असलेले ४३ आणि फक्त सारी असलेले ४२ जण असे एकूण ८५ मृत्यू झाले आहेत.
 
जिल्ह्यात सद्यस्थितीत १३७ प्रतिबंधित क्षेत्र आहे. दोघांचे एक याप्रमाणे २६५ पथकांद्वारे एकूण ५३० कर्मचाèयांकडून घरोघर सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत ९५०० घरांचे सर्वेक्षण झाले आहे. जिल्ह्यातील विविध कोव्हिड केंद्रांमध्ये जवळपास चार हजार खाटांची क्षमता उपलब्ध आहे. यापैकी आतापर्यंत केवळ १५ टक्के खाटा उपयोगात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाèयांनी दिली.
 
१० मार्च ते ७ जूनपर्यंत २३०० नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. मात्र व्हीआरडीएल लॅब सुरू झाल्यानंतर ७ जूनपासून आतापर्यंत २५ हजार नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. प्रत्येक तहसीलमधून रोज किमान ५० नमुन्यांची तपासणी करण्यात येते. याप्रमाणे अ‍ॅन्टीजन आणि आरटीपीसीआर दोन्ही मिळून रोज ८०० नमुन्यांची तपासणी होत आहे. जिल्ह्यात प्रत्येक १० लाख लोकसंख्येमागे ३०० नमुन्यांची तपासणी करण्यात येते. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ही संख्या १४० असून आपल्या जिल्ह्यात २०० टक्के तपासणी होत आहे, असे त्यांनी सांगितले.
 
यवतमाळ जिल्ह्यात कोरोना मृत्युदर २.६८ टक्के असून कोरोनाग्रस्त रुग्णाचा दर हा ७.७ टक्के आहे. हा दर १० टक्क्यांपेक्षा कमी असणे अपेक्षित आहे, असेही जिल्हाधिकारी देवेंद्र qसह यांनी सांगितले.
नागरिक गंंभीर नाहीत
जिल्ह्यात १० मार्चला तीन कोरोनाग्रस्तांपासून सुरुवात झाली असून आज हा आकडा १८६५ वर पोहचला आहे. तरीसुद्धा नागरिकांना याचे गांभीर्य नाही, ही खेदाची बाब आहे. अनेक जण विनामास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता बिनधास्तपणे फिरताना आढळतात. शासनाकडून दंड वसूल केला जातो. मास्क आणि वाहतूक संदर्भात १.७० कोटी रुपये रोख आणि न्यायालयातून ६.४२ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. मात्र कारवाईपेक्षा नागरिकांनाच स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची काळजी असायला पाहिजे, असे जिल्हाधिकारी देवेंद्र qसह म्हणाले.
७१ नवीन कोरोना रुग्णांची भर
दोघांचा मृत्यू, ३१ झाले बरे
जिल्ह्यात बुधवारी नव्या ७१ कोरोना रुग्णांची भर पडली असून दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. भरती असलेले ३१ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. मृतकांमध्ये दारव्हा अंबिकानगर येथील ५८ वर्षीय पुरुष आणि कळंब तालुक्यातील माठा येथील ४९ वर्षीय पुरुष आहे. तसेच नव्याने बाधित आलेल्या ७१ जणांमध्ये ४४ पुरुष व २७ महिलांचा समावेश आहे.
जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू आणि ३१ जणांना सुट्टी झाल्यामुळे सध्या कोरोना रुग्णसंख्या ६२६ आहे. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या १९५८ झाली आहे. यापैकी १२८१ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ५१ मृत्युची नोंद आहे.