कोरोनाचा चंद्रपुरात सहावा बळी

    दिनांक :12-Aug-2020
|
*चोवीस तासात 46 बाधितांची नोंद
*बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांचा समावेश
*बाधितांची संख्या 944
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 944 वर पोहोचली आहे. यापैकी कोरोनातून 561 बाधित बरे झाले आहेत. तर सध्या 375 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यामध्ये मंगळवारी 898 बाधितांची संख्या होती. बुधवारी सायंकाळपर्यंत 944 वर पोहोचली आहे. घुग्घुस येथील 68 वर्षीय महिला बाधितेचा मंगळवारी रात्री मृत्यु झाला आहे. कोरोनामुळे जिल्ह्यातील हा सहावा मृत्यू आहे. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता यांचा अहवालही बाधित आढळला आहे.
 
corona_1  H x W
बुधवारी पुढे आलेल्या बाधित नमुन्यांमध्ये चंद्रपूर शहरातील पोलीस लाईन परिसरातील एक, हनुमान मंदिर जवळील एक, लालपेठ कॉलरी परिसरातील एक, सुभाष नगर डब्ल्यूसीएल कॉलनी परिसरातील दोन, विवेकानंद वार्ड येथील चार, न्यू कॉलनी परिसरातील एक, डब्ल्यूसीएल कॉलनी परिसरातील एक, वृंदावन परिसरातील एक, रामनगर येथील दोन, गुरुद्वारा परिसरातील एक, रीद्धी अपार्टमेंट परिसरातील एक असे चंद्रपूर शहरातील 16 बाधितांचा समावेश आहे.
 
लक्कडकोट तालुका राजुरा, जम्मुकांता तेलंगणा, गोंडपिपरी, भद्रावती येथील प्रत्येकी एका बाधितांचा समावेश आहे. बल्लारपुरातील गोकुळ नगर वार्ड येथील दोन, हिरापूर तालुका सावली येथील तीन बाधितांचा समावेश आहे. वरोरा मालवीय वार्ड एक व कर्मवीर वार्ड एक असे एकूण दोन बाधित पुढे आलेले आहेत. ब्रह्मपुरी रेल्वे वसाहत एक, सुंदर नगर दोन, तीलक नगर एक व मांगली येथील दोन असे एकूण सहा बाधितांचा समावेश आहे. मिंथुर तालुका नागभीड येथील एक, मोहाडी येथील दोन, पळसगाव येथील तीन, पार्डी ठावरी येथील एक, मसाळी येथील एक, कोडेपार येथील एक, कन्हाळगांव येथील एक, नागभीड शहरातील तीन बाधित असे नागभिड येथील 13 बाधितांचा समावेश आहे.
 
जिल्ह्यात 15 हजार 775 नागरिकांची अँन्टीजेन तपासणी केलेली आहे. यापैकी 169 बाधित असून, 15 हजार 606 नकारात्मक आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 92 हजार 222 नागरिक दाखल झालेले आहेत. जिल्ह्यामध्ये 998 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. 1 हजार 384 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहेत.
 
जिल्ह्यातील बाधितांची संख्या 944 झाली आहे. यापैकी 0 ते 5 वर्षे वयोगटातील 18 बाधित, 6 ते 18 वर्ष वयोगटातील 67 बाधित, 19 ते 40 वर्षे वयोगटातील 573 बाधित, 41 ते 60 वर्षे वयोगटातील 236 बाधित, 61 वर्षावरील 50 बाधित आहेत. तसेच 944 बाधितांपैकी 661 पुरुष तर 283 बाधित महिला आहे. .