कोरोनामुक्तीत टोकाची घसरण, बाधित १० हजारांवर

    दिनांक :12-Aug-2020
|
-एकूण बाधित १०९८२
-कोरोनामुक्त ५३२७
-मृत्यू ४००
नागपूर, 
कोरोनाबाधित १० हजारांवरील रुग्णसंख्या पार करणारा नागपूर जिल्हा राज्यात आठवा जिल्हा ठरला आहे. मागील २४ तासात ६२१ बाधितांची नोंद झाली असून कोरोनामुक्ती ४५.५० टक्के एवढी निचांकी आली आहे.

corona_1  H x W
कोरोनामुक्तीची घसरण व बाधितांची उसळी एकदमच वाढली आहे. कोरोनामुक्तीचे प्रमाण मार्च महिन्यात केवळ ६.२५ टक्के होते. नंतर ते वाढत गेले. एप्रिलमध्ये ३१.१५, मे ७१.४८, जून ८०,२२ जुलै ६४.१६, २७ जुलै ५९.५७, ९ ऑगस्ट ५३.४३, १० ऑगस्ट ५१.८९, ११ ऑगस्ट ४८.४० तर आज ४८.५० टक्के इतके कमी झाले. बाधितांची उसळी आणि कोरोनामुक्तीची घसरण या दोन्ही बाबी चिंताजनक आहेत.
 
आरोग्य प्रशासनाकडून सायंकाळी ५ वाजेपर्यंतची स्थिती देण्यात आली. ग्रामीण भागातून आज १०४ तर शहरातून २०८ कोरोनबाधित बरे झाले. आतापर्यंत ५३२७ कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत सर्वाधिक मेडिकल रुग्णालयातून ९६० बाधित बरे झाले आहेत.
 
त्याखालोखाल मेयो रुग्णालयातून ८८५, एम्स ३१७, लष्कर रुग्णालय ५६, वोक्हार्ट १३३, रेडियन्स ५१, सेवन स्टार ५०, होप ४३, ऑरेंज सिटी ११, आमदार निवास कोविड केअर केंद्रातून १५३७, कारागृह २१६, व्हीएनआयटी ४७६, वारेगाव १७,,ओरिएंट ३४, वनामती ३९, पाचपावली १४६, कुही १, भिवापूर ४, कांद्री पारशिवनी ५९, कळमेश्वर ६९, हिंगणा ५३, सावनेर ४६, मौदा ३८, रामटेक ६, उमरेड १८, नरखेड ३५, असे एकूण ५३२७ कोरोनामुक्त झाले आहेत.
 
नागपूर शहरात आज ४१३ व ग्रामीणमध्ये २०८, अशा ६२१ बाधितांची नोंद झाली असून स्थिती दिवसेंदिवस गंभीरच होत असल्याने qचता वाढली आहे. बाधितांची एकूण संख्या १०९८२ वर पोहोचली.  मागील २४ तासात मेडिकल रुग्णालयात १३, मेयो १५, असे २८ मृत्यू झाले. त्यात ग्रामीणमधील २ व शहरातील २४ तसेच जिल्ह्याबाहेरील १ रुग्णाचा समावेश आहे. मृत्यूची एकूण संख्या ४०० झाली आहे.