सेवानिवृत्तीचा लाभ द्या, अन्यथा मुंडन करणार

    दिनांक :12-Aug-2020
|
आंदोलनाची नोटिस, १९९६ पासून देयके थकली
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
सेवानिवृत्तीचा लाभ दिला नाही, तर गुरुवार, बुधवार १३ ऑगस्ट रोजी मुंडन आंदोलन करण्याचा इशारा ग्रामविकास अधिकारी मोहन हेमणे यांनी दिला. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना निवेदन देण्यात आले आहे.
 
mundan_1  H x W
ग्रामविकास अधिकारी मोहन हेमणे ३० जून २०१८ ला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. मात्र सेवानिवृत्ती वेतन त्यांना अद्याप मिळाले नाही. त्यामुळे हेमणे यांनी मुख्यमंत्री पोर्टल, विभागीय आयुक्त, राज्य माहिती आयुक्तांकडे तक्रार दिली.
 
तरीसुद्घा पंचायत विभागाने कुठल्याही स्वरूपाची पावले उचलली नाहीत. सेवानिवृत्ती वेतन न दिल्याचे निषेधार्थ मुंडन आंदोलन करण्याचा इशारा मोहन हेमणे यांनी दिला आहे.
 
त्यामुळे कामात कसूर करणाèयांवर कारवाई करावी, अशी मागणी हेमणे यांनी निवेदनाद्वारे केली. तसेच गुरुवार, १३ ऑगस्टपर्यंत सेवानिवृत्तीचा लाभ दिला नाही, तर मुंडन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या आवारात, इमारतीत निषेध बोर्ड लावून फिरण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.