धनगर समाजासाठी घरकुल योजनेची अंमलबजावणी करा

    दिनांक :12-Aug-2020
|
खा. भावना गवळी यांचे निर्देश
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
ग्रामीण भागातील भटक्या जमातीच्या क प्रवर्गातील धनगर समाजाचे अनेक नागरिक घरकुल योजनेपासून वंचित आहेत. या संदर्भात धनगर समाजातील अनेक नागरिकांनी शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी दिल्या आहेत. या तक्रारीच्या आधारावर खासदार भावना गवळी यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश देऊन धनगर समाजाच्या लाभाथ्र्यांना प्राधान्याने लाभ देण्याचे निर्देश दिले आहेत.

bhavna gavli_1   
सामाजिक न्याय विभागाच्या धर्तीवर राज्याच्या ग्रामीण भागातील धनगर समाजातील लोकांसाठी घरकुल योजनेंंतर्गत पहिल्या टप्यात १० हजार घरकुल बांधून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाचा लाभ भटक्या जमाती प्रवर्गातील ग्रामीण भागातील धनगर समाजाला मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे या योजनेला गती देऊन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश खा. गवळी यांनी दिले आहेत.
 
घरकुल योजनेची गावपातळीवर प्रभावीपणे अंमलबजावणी करून पात्र लाभाथ्र्यांची निवड करण्यात यावी अशा सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार भटक्या जमाती प्रवर्गातील ग्रामीण भागातील धनगर समाजाच्या लोकांसाठी १० हजार घरकुल, अंदाजित खर्च १५० कोटी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
घरकुल योजनेसाठी आवश्यक असलेल्या या खर्चास शासनाने ३० जुलै २०१९ रोजी मान्यता दिली आहे. ही योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी जिल्हाधिकाèयांच्या अध्यक्षतेत समिती तयार करण्यात आली. या समितीला प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार राहणार आहे. निधी वितरणासाठी प्रथम प्रशासकीय मान्यतेच्या आदेशासह शासनास प्रस्ताव पाठवावा लागणार असून त्यानुसार शासन निधी वितरण करणार आहे.
 
शासकीय प्रक्रिया लवकर पूर्ण केल्यास लाभाथ्र्यांना घरकुलाचा लाभसुद्धा लवकर मिळणार असल्याने जिल्हा प्रशासनाने या संदर्भात योजनेला गती देण्याचे निर्देश खासदार भावना गवळी यांनी दिले आहेत.