खरेदीसाठी आता टिकटॉक रिलायन्सच्या मागे

    दिनांक :13-Aug-2020
|
-सुरुवातीच्या चर्चा सुरू
नवी दिल्ली, 
जगातील दोन महत्त्वाच्या देशांनी बंदी घातल्यानंतर टिकटॉकने आपले अॅप खरेदी करण्याबाबत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिज कंपनीवर जाळे टाकण्यास सुरुवात केली आहे.
 
 
Tik-Tok_1  H x
 
भारताने आपल्या देशात चीनचे अॅप टिकटॉक वर बंदी आणल्यानंतर अमेरिकेनेही त्यावर बंदी आणली आहे. या दरम्यान अमेरिकेचा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठा उद्योगसमूह मायक्रोसॉफ्टने टिकटॉक खरेदी करणार असल्याची चर्चा होती. परंतु, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बंदी आदेश जारी करताच टिकटॉकने आता रिलायन्सवर जाळे टाकण्यास सुरुवात केली आहे. सदर अॅपचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन मेयर यांनी रिलायन्सच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेतली आहे. एका अधिकार्‍यानुसार, दोन्ही समूहाचे अधिकारी एकमेकांच्या संपर्कात आहेत. दुसरीकडे रिलायन्स टिकटॉक खरेदी करणार असल्याच्या चर्चा सुरू असल्या तरी अधिकार्‍यांनी मात्र ही अफवा असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मायक्रोसॉफ्टनेही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. अन्य एका सूत्रानुसार, टिकटॉक खरेदी विक्रीसंबंधी चर्चा सुरुवातीच्या टप्प्यात असली तरी त्यात अनेक अडचणी असल्याचे सांगण्यात येते.