गुंजन सक्सेनाला मोठे करण्यासाठी वायूसेनेची केली बदनामी

    दिनांक :13-Aug-2020
|
- भारतीय वायूसेनेचा आरोप
- चित्रपट वादाच्या भोवर्‍यात
मुंबई, 
श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने धडक चित्रपटातून िंहदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. तिचा दुसरा चित्रपट ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ 12 ऑगस्टला ओटीटीवर प्रदर्शित झाला. मात्र आता हा चित्रपट वादात सापडला आहे. फ्लाइड लेफ्ट. गुंजन सक्सेना यांच्या जीवनावर आधारीत या चित्रपटावर भारतीय वायुसेनेने आक्षेप घेतला आहे. या आक्षेपानंतरच चित्रपटाला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले असून आयएमडीबी येथे चित्रपटाचे मानांकनही सातत्याने कमी होत आहे. चित्रपटाला 10 पैकी 4.6 मानांकन मिळाले आहे.
 

Gunjan Saxena_1 &nbs 
 
गुंजन सक्सेना युद्धात सहभागी झालेल्या देशातील पहिल्या महिला वायुसेना अधिकारी होत्या. यासाठी त्यांना शौर्य चक्र देण्यात आले होते. विशेष म्हणजे समीक्षक आणि प्रेक्षकांकडून या चित्रपटाचे कौतुक होत असतानाच, वायुसेनेच्या आरोपांनंतर या चित्रपटाला घराणेशाहीची निर्मिती म्हटले जाते आहे.
 
 
भारतीय हवाई दलाने चित्रपटातील बर्‍याच दृश्यांवर आक्षेप घेतले असून सेन्सॉर बोर्डाकडेही तक्रार केली आहे. या संदर्भात हवाई दलाने सेन्सॉर बोर्डाला लेखी तक्रार दिली असून या सिनेमात काही पात्रांना नकारात्मक दर्शविल्यावर आक्षेप घेतला आहे.
 
 
सेन्सॉर बोर्डाला दिलेल्या तक्रारीत हे आहेत आरोप
वायुसेनेने आपल्या तक्रारीत स्पष्ट केले की, एक्स फ्लायड लेफ्ट. पडद्यावर गुंजन सक्सेना यांना मोठे दाखवण्यासाठी मेसर्स धर्मा प्रॉडक्शनने अशा अनेक गोष्टी दाखवल्या ज्याचा काहीही संबंध नाही. त्यातही भारतीय वायूसेना महिलांना काम करण्यासाठी अयोग्य असल्याचे दाखवण्यात आले आहे.