वाशीम जिल्ह्यात आणखी 28 कोरोनाबाधित

    दिनांक :13-Aug-2020
|
वाशीम,
वाशीम जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण मेडशी ता. मालेगाव येथे 3 एप्रिल रोजी निष्पन्न झाला होता. मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात केवळ 8 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. जून, जुलै महिन्यात बाधितांच्या संख्येत वाढ होत गेली. ऑगस्ट महिन्यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ऑगस्ट महिन्याच्या 15 दिवसात तब्बल 600 रुग्ण आढळून आले.
 
washim_1  H x W 
 
आज, दुपारी 12 वाजता प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 28 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून, त्यात वाशीम शहरातील ड्रीमलॅन्ड सिटी परिसरातील 3, काटीवेस परिसरातील 7, अनसिंग येथील 1, साखरा येथील 3, पार्डी आसरा येथील 1, रिसोड शहरातील जिजाऊ नगर येथील 1, देशमुख गल्ली येथील 1, एकलासपूर येथील 1, गोहगाव येथील 2 , मालेगाव तालुक्यातील शिरसाळा येथील 3, मुठ्ठा येथील 2, शिरपूर जैन येथील 3 व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
 
 
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1048 झाली असून, 675 जणांनी कोरोनावर मात केली. तर 18 रुग्णांचा मृत्यू झाला तर एका रुग्णाने आत्महत्या केली. सदर आकडेवारीत जिल्ह्यात उपचार घेणारे व जिल्ह्याबाहेर उपचार घेणार्‍या रुग्णांचाही समावेश आहे.