24 तासात कोरोनाचे 67 हजार नवे रुग्ण

    दिनांक :13-Aug-2020
|
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, 
गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे विक्रमी 67 हजार नवे रुग्ण सापडले. यामुळे देशातील संक्रमितांची संख्या 24 लाखाच्या घरात गेली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 17 लाखाच्या जवळ पोहोचली आहे.
 

corona_1  H x W 
 
66999 नवे रुग्ण सापडल्यामुळे देशातील कोरोना संक्रमितांची संख्या 23 लाख 96 हजार 637 झाली आहे. तर 942 जणांच्या मृत्युमुळे देशातील कोरोनाबळींची संख्या 47033 वर पोहोचली आहे. देशाचा मृत्युदर झपाट्‌‌‌याने घसरत 1.96 टक्क्यांवर आला आहे.6 लाख 53 हजार 622 रुग्णांवर देशाच्या विविध भागात उपचार असून हे प्रमाण 27.27 टक्के आहे.
 
 
गेल्या 24 तासात 56383 रुग्ण बरे झाल्यामुळे देशात आतापर्यंत बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 16 लाख 95 हजार 982 झाली आहे. ही टक्केवारी 70.77 आहे.
 
 
महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 18650 बळी गेले आहेत. त्याखालोखाल तामीळनाडूत 5278, दिल्लीत 4153, कर्नाटकात 3510, गुजरातमध्ये 2713, आंध्रप्रदेशात 2296, उत्तरप्रदेशात 2230 तर पश्चिम बंगालमध्ये 2203 कोरोनाचे बळी गेले आहेत.
बुधवारी एकाच दिवशी आतापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजे 8 लाख 30 हजार 391 चाचण्या करण्यात आल्यामुळे देशात आतापर्यंत झालेल्या चाचण्यांची संख्या 2 कोटी 68 लाख 45 हजार 688 झाली आहे.