‘सडक 2’ मधले ‘ते’ गाणे पाकिस्तानी गाण्याची कॉपी

    दिनांक :13-Aug-2020
|
- संगीतकाराचा आरोप
मुंबई, 
दिग्दर्शक महेश भट याच्या ‘सडक 2’ या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरवर नेटकर्‍यांनी नापसंतीचा अक्षरश: वर्षाव केला. गेल्या 24 तासांत 52 लाखांपेक्षा अधिक जणांची नापसंती या ट्रेलरला मिळाली आहे. दरम्यान या चित्रपटातील एका गाण्यावर कॉपी केल्याचा आरोप होतो आहे. सडक 2 मधील ‘इश्क कमाल’ हे गाणे एका पाकिस्तानी गाण्याची कॉपी असल्याचा आरोप पाकिस्तानी संगीत दिग्दर्शक शहजन सलीम याने केला आहे. आपला आरोप सिद्ध करण्यासाठी त्याने या दोन्ही गाण्यांची चित्रफित देखील सादर केली आहे.
 

Sadak-2_1  H x  
 
काही दिवसांपूर्वी मी सडक 2 या चित्रपटातील ‘इश्क कमाल’ हे गाणे ऐकले. हे गाणे यापूर्वी देखील कुठेतरी ऐकल्याचे मला वाटत होते. अखेर थोडा विचार केल्यावर माझ्या लक्षात आले, की अशाच एका गाण्याची रचना मी 2011 मध्ये केली होती. त्या गाण्याचे नाव ‘रब्बा हो’ असे होते. हे गाणे सडक 2 चित्रपटात हुबेबुब कॉपी करण्यात आले आहे. असे म्हणत शहजन सलीम याने ‘इश्क कमाल’ या गाण्यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय आपला आरोप सिद्ध करण्यासाठी त्याने दोन्ही गाण्यांची चित्रफित देखील सादर केली आहे.