सर्वोच्च न्यायालयात पुढच्या आठवड्यापासून प्रत्यक्ष सुनावणी!

    दिनांक :13-Aug-2020
|
- न्यायमूर्तीच्या समितीचा सर्वच पैलूंवर विचार सुरू
नवी दिल्ली, 
सुरक्षेच्या अतिरिक्त उपाययोजना करीत सर्वोच्च न्यायालयातील 15 पैकी किमान दोन ते तीन न्यायासनांची पुढील आठवड्यापासून प्रत्यक्ष सुनावणी सुरू करण्यात यावी, अशी शिफारस सर्वोच्च न्यायालयातील सात न्यायमूर्तींच्या समितीने केली आहे.
 

Delhi High Court_1 & 
 
25 ंमार्चपासून देशव्यापी टाळेबंदी घोषित केली, तेव्हापासून सर्वोच्च न्यायालयात आभासी स्वरूपात सुनावणी सुरू झाली आहे. टाळेबंदी शिथिल करण्यात आल्यानंतरही येथे आभासी स्वरूपातच सुनावणी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
 
सर्वोच्च न्यायालयात सध्या तरी प्रत्यक्ष सुनावणी घेतली जाऊ नये आणि दोन आठवड्यांनंतर या मुद्यावर फेरविचार करण्यासाठी बैठक घेतली जाईल, असे बार चेंबरच्या पदाधिकार्‍यांनी ज्येष्ठ न्यायमूर्ती एन. व्ही. रामन्‌ अध्यक्ष असलेल्या सात न्यायमूर्तींच्या समितीला कळवले होते.
 
 
या समितीने बार चेंबरच्या पदाधिकार्‍यांची मंगळवारी भेट घेतली आणि पुढील आठवड्यात दोन ते तीन न्यायासनांत प्रत्यक्ष सुनावणी सुरू करण्याचा गांभीर्याने विचार केला जात असल्याची माहिती दिली, असे ‘सुप्रीम कोर्ट अॅडव्होकेट्‌स ऑन रेकॉर्ड असोसिएशन’चे अध्यक्ष शिवाजी एम. जाधव यांनी सांगितले. दरम्यानच्या काळात सर्वोच्च न्यायालयाची रजिस्ट्री प्रत्यक्ष सुनावणी घेण्याच्या तयारीसाठी आवश्यक ती पाऊले उचलणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
 
 
आवश्यक कार्यवाहीसाठी न्यायमूर्तींची समिती आपली शिफारस सरन्यायाधीश शरद बोबडे यांना सादर करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. प्रत्यक्ष सुनावणीसाठी ही समिती सर्वच पैलूंवर विचार करीत आहे, अशी माहिती देखील सूत्रांनी दिली.