नवेगावखैरी धरणातून पाण्याचा विसर्ग

    दिनांक :13-Aug-2020
|
- पेंच तोतलाडोह 92.43 टक्के भरला
नागपूर, 
गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे नागपूर जिल्हयातील धरणांचा पाणीसाठा वाढलेला आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार नवेगाव खैरी प्रकल्पातून 126.74 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे.
 
 
Pench Totladoh_1 &nb
 
गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोठे आणि मध्यम सिंचन प्रकल्प चांगलेच भरलेले आहे. प्रकल्पात क्षमतेपेक्षा जास्त पाणीसाठा झाल्याने काही धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. पेंच तोतलाडोह प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा (दलघमी) 1016.88, संकल्पीय विसर्ग क्षमता (क्युसेक) 12702, आजचा पाणीसाठा (दलघमी) 939.86, टक्केवारी 92.43, सांडव्यातुन सोडलेला विसर्ग (क्युसेक) निरंक, नवेगावखैरी प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा (दलघमी) 141.98, संकल्पीय विसर्ग क्षमता (क्युसेक) 15618, आजचा पाणीसाठा (दलघमी) 130.18, टक्केवारी 91.69, सांडव्यातुन सोडलेला विसर्ग (क्युसेक) 126.74, नांद प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा (दलघमी) 53.18, संकल्पीय विसर्ग क्षमता (क्युसेक) 5238, आजचा पाणीसाठा (दलघमी) 19.73, टक्केवारी 37.10, सांडव्यातुन सोडलेला विसर्ग (क्युसेक) निरंक, वडगांव प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा (दलघमी) 134.89, संकल्पीय विसर्ग क्षमता (क्युसेक) 10887, आजचा पाणीसाठा (दलघमी) 90.26, टक्केवारी 66.91, सांडव्यातुन सोडलेला विसर्ग (क्युसेक) 8.53, खेकरानाला (मध्यम) प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा (दलघमी) 23.81, संकल्पीय विसर्ग क्षमता (क्युसेक) 1343, आजचा पाणीसाठा 17.77 दलघमी असून टक्केवारी 74.62 आहे.