अखेर वुहान प्रयोगशाळेने तोंड उघडले

    दिनांक :13-Aug-2020
|
बिजिंग,
‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’च्या प्रयोगशाळेतून जगभरात कोरोना संसर्गाचा फैलाव झाल्याचा आरोप प्रयोगशाळेचे संचालक वांग येन ई यांनी फेटाळून लावला आहे.
 
 
wuhan lab_1  H
 
गत सात ऑगस्ट रोजी अमेरिकेतील ‘एनबीसी’च्या पत्रकाराने चीनच्या वुहान विषाणू प्रयोगशाळेचा दौरा केला होता. या प्रयोगशाळेत दाखल होणारे ‘एनबीसी’ हे पहिले विदेशी प्रसारमाध्यम ठरले आहे. यावेळी प्रयोगशाळेचे संचालक वांग येन ई यांनी मौन सोडले व कोरोना विषाणूबाबतची आपली भूमिका मांडली.
 
 
‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’च्या प्रयोगशाळेतून जगभरात कोरोना संसर्ग पसरल्याचा दावा करण्यात येत आहे. अमेरिकेनेही सातत्याने हा दावा केला आहे. अमेरिकेसह अनेक देशांनी कोरोना मुद्यावर चीनवर मोठ्या प्रमाणावर आरोप केले. या प्रयोगशाळेत विषाणूंवर संशोधन करण्यात येत असून या संस्थेत सुमारे 1500 विषाणू असल्याचे बोलले जाते.
 
 
आमच्या प्रयोगशाळेत सार्ससारख्या न्यूमोनियाच्या विषाणूचे नमुने 30 डिसेंबर आढळले होते व हे नमुने एका रुग्णालयातून आमच्याकडे आले होते. ही बाब आम्ही आधीपासून सांगत आलो आहे. यापूर्वी प्रयोगशाळेत कोणीच कोरोना विषाणूवर काम केले नाही. त्यामुळे या प्रयोगशाळेतून कोरोनाचा विषाणू पसरला, या दाव्यात काहीच तथ्य नाही, असे या संस्थेचे उपसंचालक युआन झििंमग यांनी सांगितले.
 
आम्हाला चीन व अमेरिका दरम्यानच्या संबंधात तणाव नको आहे. हा तणाव जागतिक स्थिरता व प्रगतीसाठी चांगला नाही. कोरोना संसर्गाच्या तपासावर राजकारणाचा प्रभाव पडता कामा नये, अशी अपेक्षा प्रयोगशाळेतील संशोधक युआन ची िंमग यांनी व्यक्त केली.