दुधाच्या भावासाठी मुख्यमंत्र्यांना पाच लाख पत्र

    दिनांक :13-Aug-2020
|
अंबाडा येथून आंदोलनाच्या तिसर्‍या टप्प्याचा प्रारंभ
डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात सुरूवात
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
राज्यात दूध उत्पादक शेतकर्‍यांचा प्रश्न खूप पेटला आहे. दुधाला 30 रुपये भाव, 10 रुपये अनुदान व दुधाच्या भुकटीला 50 रुपये अनुदानाच्या मागण्यांसाठी भाजप व युती पक्षातर्फे दूध आंदोलनाला सुरुवात झाली. 13 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान तिसरे आंदोलन होत आहे. या आंदोलनमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून 5 लाख पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले जाणार आहेत. त्याची सुरुवात माजी कृषिमंत्री व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी आपल्या कार्यकर्ते व शेतकर्‍यांसोबत मोर्शी तालुक्यातील अंबाडा येथून केली.
 

Bonde _1  H x W 
 
भाजप सरकारच्या काळात सुद्धा असाच प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न त्यांच्या मागण्या पूर्ण करून मार्गी लावला होता. परंतु या कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये दुधाचे पदार्थ, चहा कॅन्टीन बंद असल्याने दुधाचे भाव पडले व या संकटाच्या काळात सरकारने शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे होते, परंतु सरकार शेतकर्‍यांची कोणतीही मागणी पूर्ण करताना दिसत नाही. भाजप व महायुतीतर्फे आधी मुख्यमंत्री व सर्व मंत्र्यांना दूध पाठविण्यात आले, दुसर्‍या टप्प्यात दुधाचे संकलन बंद केले आणि गुरूवारपासून आंदोलनाचा तिसरा टप्पा चालू झाला आहे.
माजी कृषिमंत्री व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी अंबाडा येथे गाईच्या गोठ्यातून गाईचे पूजन करून, आरती ओवाळून शेतकरी व कार्यकर्त्यांसमवेत गोठ्यातूनच मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले. यावेळी ‘मुख्यमंत्री जागे व्हा, शेतकर्‍यांच्या मागण्या पूर्ण करा’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजपा मोर्शी तालुकाध्यक्ष देवकुमार बुरंगे, भाजपा जिल्हा सचिव अशोक खवले, ज्योतिप्रसाद मालवीय, जिल्हा परिषद सदस्य सारंग खोडस्कर, मोर्शी शहराध्यक्ष रवी मेटकर, रुपेश ढोले, राजकुमार विश्वकर्मा, अनिरुद्ध तडस, निलेश गणोरकर, सागर तडस, जुबेर पटेल, अभिजित कविटकर, गजानन दहीकर, सुधीर उघडे, राजा बानाईत, सूरज जैस्वाल, भूषण खोडस्कर, दर्शन गणोरकर, गौरव खासबागे, उमेश घाटोळ, रितेश तडस, परिमल बानाईत, नंदू खोबरे यासह शेतकरी उपस्थित होते.