अमरावती जिल्ह्यात दमदार पाऊस

    दिनांक :13-Aug-2020
|
पावसाची अखंड रिपरिप
खरीपाच्या पिकांना संजीवनी
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
अमरावती शहरासह जिल्ह्यात या मौसमातला दमदार पाऊस बुधवारी रात्रीपासून सुरू झाला. गुरूवारी दिवसभर पावसाची अखंड रिपरिप सुरू होती. या पावसाने खरीपाच्या पिकांना संजीवनी मिळाली आहे.
  
AM Rain _1  H x
 
जिल्ह्यात जुन व जुलै आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाला व तो पिकांसाठी उपयुक्तपण होता. त्यामुळेच जिल्ह्याची पिक स्थिती चांगली आहे. पण, सलग किंवा झडीच्या स्वरूपातला पाऊस जिल्ह्यात झाला नव्हता. त्या पावसाची अमरावतीकर आतुरतेने वाट पाहत होते. वेधशाळेने या आठवड्यात चांगला पाऊस होईल, अशी शक्यता व्यक्त केली होती. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी दुपारपर्यंत अधून-मधून पाऊस आला. मात्र, बुधवारी रात्री पासून पावसाने समाधानकार हजेरी लावली. रात्री व गुरूवारी सकाळी आणि पुढे संध्याकाळपर्यंत पावसाची अखंड रिपरिप सुरू होती.
 
जमिनीत मुरणार पाऊस असल्यामुळे जलपातळीत वाढ होणार आहे. वातावरणातही चांगलाच गारवा आला आहे. खरीपाच्या सर्वच पिकांची स्थिती चांगली आहे. या पावसाने पिके अधिक समृद्ध होणार आहे. जिल्ह्यातले नदी व नाले वाहते झाले आहे. कोणत्याच भागातून अप्रीय घटनेचे वृत्त नाही. येणार्‍या पावसामुळे नागरिक समाधानी झाले आहे. जिल्ह्यातल्या धरणांच्या जलसाठ्यातही वाढ झाली आहे. मोर्शी तालुक्यातल्या अप्पर वर्धा धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला असून चांदूर बाजार तालुक्यातील पूर्णा धरणाचा दोन दरवाजे उघडण्यात आले आहे. उर्वरीत धरणांमध्ये अपेक्षित जलसाठा आहे. पाऊस आणखी जास्त झाला तर त्या धरणांचेही दरवाजे उघडले जाणार आहे.