भारताने चिनी कम्युनिस्ट पक्षाकडे स्पष्ट केली भूमिका

    दिनांक :13-Aug-2020
|
-विक्रम मिस्री यांनी घेतली लिऊ जियान्चाओंची भेट
बिजिंग, 
चीनमधील भारताचे राजदूत विक्रम मिस्री यांनी चिनी कम्युनिस्ट पार्टीचे वरिष्ठ अधिकारी लिऊ जियान्चाओंची भेट घेऊन पूर्व लडाख आणि सर्वंकष द्विपक्षीय संबंधांबाबत भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत या दोन्ही अधिकार्‍यांची चर्चा झाली.
 

Vikram Misri-Liu Jianchao 
 
भारताचे राजदूत विक्रम मिस्री यांनी परराट्र व्यवहार आयोगातील चीन कम्युनिस्ट पार्टीच्या मध्यवर्ती समिती कार्यालयाचे उपसंचालक लिऊ जियान्चाओ यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पूर्व लडाखमधील परिस्थिती आणि सर्वंकष द्विपक्षीय संबंधांबाबत भारताची भूमिका स्पष्ट केली, असे ट्विट बीिंजगमधील भारतीय दूतावासाने केले आहे.
 
 
या महिन्याच्या सुरुवातीला भारत-चीनमध्ये मेजर जनरल पातळीची चर्चा दौलत बेग ओल्डी परिसरात झाली. यावेळी चीनने प्रत्यक्ष लडाख सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरून माघार घेण्याबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पूर्व लडाखमधील िंफगर-5 आणि गोगरा येथे सध्या चिनी सैन्य आहे आणि या परिसरातून माघार घेण्यास चीनने नकार दिला. या परिसरातून चिनी लष्कराने लवकरात लवकर माघार घ्यावी, अशी मागणी भारताने केली आहे. भारताने पूर्व लडाखमध्ये तोफखान्यासह 15 हजार लष्करी जवानांना तैनात केले आहे.