बुलढाणा जिल्ह्यात 38 कोरोना बाधीत

    दिनांक :13-Aug-2020
|
- 2067 कोरोनाबाधित, 1234 सुट्टी, 795 उपचार
बुलडाणा,
जिल्ह्यातील कोरोना अहवालानुसार प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 250 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 212 अहवाल कोरोना नकारात्मक असून 38 अहवाल बाधीत प्राप्त आले आहे. बाधीत अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 29 व रॅपिड टेस्टमधील 9 अहवालांचा समावेश आहे.
 
 
corona_1  H x W
 
नकारात्मक अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 82 तर रॅपिड टेस्टमधील 130 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 212 अहवाल नकारात्मक आहेत. आज रोजी 126 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण नकारात्मक अहवाल 13225 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2067 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1234 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 795 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 38 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.