खा. नवनीत राणा यांना मुंबईला हलविले

    दिनांक :13-Aug-2020
|
नागपूर,
अमरावतीच्या खा. नवनीत राणा यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने आज दुपारी तातडीने मुंबईला नेण्यात आले.
 

Navneet Rana_1   
 
मागील आठवड्यात त्यांना कोरोनाची बाधा झाल्याने अमरावती येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या तब्येतीत सुधारणा न झाल्याने सोमवारी रात्री उशिरा नागपुरातील वोक्हार्ट रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर सुरळीत उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी सकाळपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून असलेल्या डॉक्टरांनी तपासणी केली असता नवनीत राणा यांच्या फुफ्फुसावर प्रादुर्भाव झाला असल्याचे निष्पन्न झाले.
 
 
राणा कुटुंबीयांनी डॉक्टरांसोबत विचारविनिमय केल्यानंतर नवनीत राणा यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तातडीने आज दुपारी आ. रवि राणा त्यांना घेऊन रुग्णवाहिकेने मुंबईला रवाना झाले. आ. रवि राणा यांचे आई- वडील नागपुरात वोक्हार्ट रुग्णालयात उपचार घेत असल्याने आ. रवि येथेच होते. त्यांनाही लागण झाली. त्याचे इतर कुटुंबीय अमरावतीत विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.