पेवर ब्लॉक कामात अफरातफर,

    दिनांक :13-Aug-2020
|
- चौघांवर गुन्हे दाखल
तभा वृत्तसेवा
आर्णी,
नगर परिषदेच्या पेवर ब्लॉक कामात संगनमत करून अफरातफर केल्याप्रकरणी 11 ऑगस्ट रोजी मुख्याधिकार्‍यांनी आर्णी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी आरोपी विजय मनोहर ढोले (वय 45), तुपटाकळी, मोहिब अफसर अब्दुल गनी (वय 34), यवतमाळ, अन्सार बेग रहीम बेग (वय 37), अमराईपुरा, आर्णी, सुरेंद्र गोिंवद अदापुरे (वय 57), ग्रीनपार्क, आर्णी या चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींनी संगनमत करून नगर परिषदेत वर्ष 2014-15 ला प्रभाग क्रमांक तीनमध्ये चार ठिकाणचे पेवर ब्लॉक बसवले.
 

Paver block work_1 & 
 
या कामात 1 लाख 08 हजार 575 रुपयांचा अपहार करून त्यातील 73 हजार 857 रुपये आरोपींनी नगर परिषदेत जमा केले आणि 34 हजार 718 रुपये स्वत:च्या फायद्यासाठी वापरल्याची तक्रार मुख्याधिकार्‍यांनी दिली होती.