झायडसतर्फे रेमेडेसिव्हिरची जेनेरिक औषध

    दिनांक :13-Aug-2020
|
- 2,800 रुपये  किंमत 
नवी दिल्ली, 
कोरोनाची विविध लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ‘रिमडॅक’ नावाची रेमेडेसिव्हिरची जेनेरिक औषधी भारतीय बाजारपेठेत सादर केली आहे, अशी घोषणा झायडस कॅडिला या औषध कंपनीने गुरुवारी येथे केली.
 

Remdesivir_1  H 
 
रिमडॅक हा भारतातील सर्वात किफायतशीर रेमेडेसिव्हिर ब्रॅण्ड आहे. या रिमडॅकची किंमत प्रती कुपी 2,800 रुपये आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणार्‍या शासकीय व खाजगी रुग्णालयांपर्यंत गटाच्या वितरण शृंखलेव्दारे हे औषध संपूर्ण भारतात उपलब्ध होईल, असे कॅडिला हेल्थकेअरचे व्यवस्थापकीय संचालक शर्विल पटेल यांनी म्हटले आहे.
 
 
गुजरातमधील औषध निर्मिती केंद्रात औषध विकसित व निर्मितीचे काम करण्यात येत आहे. गत जून महिन्यात झायडस कॅडिला कंपनीने गिलिड सायन्ससोबत रेमेडेसिव्हिरचे उत्पादन व विक्रीसंदर्भात करार केला. या करारांतर्गत कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येत आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाव्दारे मान्यताप्राप्त हे संशोधनात्मक औषध आपात्कालीन उपयोग करण्यासाठी अधिकृत करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
 
 
झायडस कॅडिलाची लस ‘झिकोव्ह-डी’ आता मानवी चाचणीच्या टप्प्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. भारतात रेमेडेसिव्हिरचे जेनेरिक औषध बाजारात आणणारी झायडस कॅडिला ही पाचवी कंपनी आहे.