राफेलला पाहून चीनने केली 36 विमाने तैनात

    दिनांक :13-Aug-2020
|
- होतान हवाईतळावर हालचाली
नवी दिल्ली,
सध्या लडाख खोर्‍यात राफे ल लढाऊ विमानांनी सराव सुरू असून, घाबरलेल्या चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील होतान हवाईतळावर तातडीने 36 विमाने तैनात केली आहेत. याठिकाणी मोठ्या हालचाली दिसून येत असल्याची माहिती आहे. यापूर्वी हवाईतळावर 12 लढाऊ विमाने तैनात होती.
 
 
Raphael_1  H x
 
माहितीनुसार, हवाईतळावर 28 जुलैला अचानक वेगवेगळ्या प्रकारची 36 लढाऊ विमाने आणण्यात आली आहेत. यात जे-11 ही रशियन बनावटीची 24 बॉम्बवर्षक विमाने आहेत. चीनने सहा जुनी जे-8 जेट, दोन वाय-8 ट्रान्सपोर्ट्‌स जेट्स, दोन केजे-500 एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग एअरक्राफ्ट आणि दोन एमआय-17 हेलिकॉप्टर्सचा समावेश आहे.
 
 
असे असले तरी होतान हवाईतळावरून उड्डाण करण्यासाठी चीनची सर्व विमाने सक्षम नसल्याचे सांगण्यात येते. झिनजियांग प्रांतामध्ये मोठमोठे पर्वत असून, त्यावर उडणारी विमाने चीनकडे सध्यातरी नाहीत.
 
 
कदाचित भारतासोबत युद्ध झाल्यास ही विमाने केवळ होतानवरूनच उड्डाण करणार नाहीत, तर ती काश्गर आणि नगारी कुंशा हवाईतळावरूनही उड्डाण करणार आहेत. मात्र, लडाखपासून काश्गर 350 किमी आणि नगारी कुशा 190 किमी दूर आहेत. चीनची लढाऊ विमाने जितक्या लांब अंतरावरून येतील तितक्या वेळात भारताला मोठी तयारी करणे शक्य होणार आहे. अर्थातच भारतीय विमानांना शत्रूचा हल्ला आरामात परतवून लावता येणार आहे.
 
 
भारताची बाजू
चीनकडे असलेली लढाऊ विमाने भारताच्या राफे लसारखी हवेत तब्बल 12 तास उडू शकत नाहीत. म्हणजेच ही विमाने चीनचे मनसुबे उद्ध्वस्त करू शकणार आहेत. ल़डाखमध्ये त्या वातावरणात उडू शकणारी मिग-29 के आणि सुखोईसारखी लढाऊ विमाने आधीपासूनच तैनात आहेत, हे विशेष. लडाखमध्ये रोहिणी रडार तैनात करण्यात येणार आहे. शिवाय एकाचवेळी सहा शस्त्रे शोधणारा स्वाती रडार आधीपासूनच तैनात आहे.