विदर्भाच्या तीन क्रिकेटपटूंची आयपीएल स्पर्धेत वर्णी

    दिनांक :13-Aug-2020
|
- ठाकरे, भुते, दुबेचा समावेश
नागपूर, 
घरगुती क्रिकेट स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करणाèया विदर्भाच्या तीन क्रिकेटपटूंची आयपीएलच्या आगामी आयपीएलच्या स्पर्धेसाठी निवड झाली असून यात नागपूरचा नचिकेत भफते, सौरभ दुबे आणि आदित्य ठाकरे यांचा समावेश आहे.
 

Saurabh Dube_1   
 
आयपीएलचा १३ हंगाम १९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातच्या अबुधाबी येथे खेळली जाणार आहे. रेशीमबागेतील रेशीमबाग जिमखानाचा अष्टपैलू खेळाडू डावखुèया नचिकेतने कुचबिहार स्पर्धेत सर्वाधिक ५५ गडी बाद करीत निवड कत्र्यांचे लक्ष आपल्या कडे वेधले होते. याशिवाय मागीलवर्षी झालेल्या सी के नायडू क्रिकेट स्पर्धेतही पाच सामन्यांत १५ गडी बाद करीत आपली दावेदारी सिद्ध करीत आयपीएलच्या लिलावात निवड कत्र्याला निवड करण्यास भाग पाडले आहे.
 
 
Aditya Thakre_1 &nbs
 
तर २१ वर्षीय डावखुरा मध्यमगती गोलंदाज असलेल्या वर्धेचा सौरभ दुबेचीची मुंबई इंडियन्स संघात वर्णी लागली आहे. सौरभने कर्नल सी के नायडू स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. याशिवाय बांगलादेशातील एमर्जिंग आशिया चषकातही त्याला संधी मिळाली होती.
 

Nachikel Bhute_1 &nb 
 
तर अकोल्याच्या आदित्य ठाकरेची विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात वर्णी लागली आहे. आदित्यने ज्युनिअर क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी बजाविल्यानंतर रणजी करंडक स्पर्धेत देखील अनोखी ओळख निर्माण केली होती. आदित्यने ज्युनिअर वल्र्डकपमध्ये जेतेपद प्राप्त करणाèया भारतीय संघाचाही तो सदस्य राहिला आहे. तसेच सी के नायडू क्रिकेट स्पर्धेत आदित्यने आठ सामन्यांमध्ये चाळीसहून अधिक खेळाडू बाद केले होते. या तिन्ही खेळाडूंनी घरेलू क्रिकेट स्पर्धेत अवीट अशी छाप सोडत आयपीएलमध्ये निवडकत्र्यांवर प्रभाव पाडला. याच कामगिरीच्या जोरावर या खेळाडूंना आयपीएलमध्ये स्थान मिळाले आहे.