2 हजार 397 जणांवर कारवाईचा बडगा

    दिनांक :13-Aug-2020
|
- 4 लाख 86 हजार रूपयाचा ठोठावला दंड
- मास्क न वापरणे भोवले
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
कोरोनाच्या सावटात नियमांचे सर्रास उल्लंघन करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. आतापर्यंत 2 हजार 397 जणांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून 4 लाख 86 हजार 790 रूपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी लागू करण्यात आली असून, नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, टाळेबंदीत काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली असून, नागरिकांना शासनाने निर्गमित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. पण, नियमांचे उल्लंघन करीत रस्त्यावर मास्क न लावता फिरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, अवैधरित्या खर्रा विक्री करणे, विनापरवानगिने निर्धारित वेळेहून अधिक तास दुकाने सुरू ठेवणार्‍यांवर कारवाई करण्यात आली.
 
 
gardi_1  H x W:
 
ही कारवाई सहाय्यक आयुक्त सचिन पाटील, शितल वाकडे, धनंजय सरनाईक यांच्या नेतृत्वात झोनचे क्षेत्रीय अधिकारी भाऊराव सोनटक्के, नरेंद्र बोभाटे, सुभाष ठोंबरे, अतिक्रमण विभाग प्रमुख राहुल पंचबुद्धे, नामदेव राऊत, स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी, उदय मैलारपवार, भूपेश गोठे, विवेक पोतनुरवार, महेंद्र हजारे, अनिरूद्ध राजुरकर, अनिल ढवळे, संतोष गर्गेलवार, जगदीश शेंदरे यांनी केली.