शारीरिक शिक्षण संचालकांनी संशोधनावर लक्ष केंद्रीत करावे

    दिनांक :13-Aug-2020
|
- डॉ. माधवी मार्डीकर यांचे प्रतिपादन
नागपूर,
सेवांतर्गत पदोन्नतीच्या तिसऱ्या निकषात संशोधनावर मिळणाऱ्या अंकावर व त्यातील सुक्ष्म बाबींवर लख केंद्रीत करायचे सांगत शारीरिक शिक्षण संचालकांनी संशोधन कार्यावर लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
 
krida_1  H x W: 
 
पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, शासकीय विज्ञान महाविद्यालय, जे एम पटेल महाविद्यालय, मनोहरभाई पटेल महाविद्यालय, ताई गोलवलकर महाविद्यालय याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाची शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाची संचालिका अनिता लोखंडे, डॉ. तनुजा राउत, डॉ. हरेष त्रिवेदी आदी उपस्थित होते. दुसऱ्या दिवसाच्या कार्यशाळेची पहिल्या सत्राची सुरुवात डॉ. मार्डीकर यांनी केली.
 
 
द्वितीय सत्रात डॉ. रोमी बिष्ट यांनी मार्गदर्शन केले. संचालन डॉ. सुयश पंडागडे यांनी तर आभार डॉ. भीमराव पवार यांनी मानले. गुरुवारी होणाऱ्या अंतिम सत्रापमध्ये प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नीरज खटी तर विशेष अतिथी म्हणून नागपूर विद्यापीठ शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सुर्यवंशी राहणार आहे. प्रमुख वक्ता डॉ. माधवी मार्डीकर कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे.