मृतकाच्या कुटुंबीयांना धनादेशाचे वितरण

    दिनांक :13-Aug-2020
|
- आमदार पाटणी यांनी घेतली तातडीने गंभीर दखल
मानोरा,
मानोरा तालुका अंतर्गत येत असलेल्या ग्राम तळप येथील मृतकाच्या कुटुंबीयांना धनादेशाचे वीतरण भाजपा तालुकाध्यक्ष ठाकुरसिंग चव्हाण, संगांयोचे अध्यक्ष नीळकंठ पाटील व वीद्युत वीतरण कंपनीचे शाखा अंभीयंता व्ही.डी.राठोड यांच्या हस्ते देण्यात आले. तळप येथील सुरज गुणवंता मळघणे वय ११ वर्ष ह्या मुलाचे खेळत असताना जीवंत वीद्युत तारेला स्पर्श होऊन घटना स्थळीच २९/७/२०२० दुर्दैवी मृत्यू झाला होता,ह्या घटनेची सवीस्तर माहीती ह्या वीभागाचे आमदार राजेंन्द्र पाटणी यांना नीळकंठ पाटील यांनी दिली होती, सदारील घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पाटणी यांनी तातडीने वीतरण कंपनीचे वरीष्ठ अधीकारी यांना बोलुन संबधीत कुंटुबास तातडीने नियमानुसार मदत देण्याचे सांगीतले होते,त्यानुसार अवघ्या१३ दिवसातचं धनादेश मानोरा कार्यालयाला प्राप्त झाले.
 
dhanadesh_1  H  
 
मृतकाच्या कुटुंबीयांना हे धनादेश तळप येथे अनुसया गुणवंता मळघणे यांच्या सुपुर्द करण्यात आला.ह्या प्रसंगी पोलीस पाटील राजु गोदमले, श्रीराम गोदमले, तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव धोगंडे, ऊपसरपंच भगवान राठोड, अभिजीत चव्हाण, लष्कर राठोड, एच आर वारेकर, पंचफुला आत्माराम मळघणे यांची ऊपस्थीती होती,ह्या वेळी मा,आ.पाटणी साहेबांनी केलेल्या कामाची ऊपस्थीत आदीवासी बांधवानी आभार मानले.