गडचिरोलीत 24 नवे कोरोनाबाधित, 18 कोरोनामुक्त

    दिनांक :13-Aug-2020
|
गडचिरोली,
जिल्हयात आज नव्याने 24 जण कोरोनाबाधित आढळून आले. तसेच 18 जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोनाबाधितांची आकडेवारी 171 झाली. तर आतापर्यंत 629 जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. जिल्हयातील एकूण बाधितांची संख्या 801 झाली.
 
gadchiroli govt hospital_
 
आज नव्याने 24 बाधित मिळाले त्यामध्ये गडचिरोली 3, भामरागड 1, सिरोंचा 2, अहेरी 7, चामोर्शी 1, धानोरा 7, आरमोरी 1 व कोरची तालुक्यातील 2 रूग्णांचा समावेश आहे. यामध्ये गडचिरोलीमधील बाधित रूग्णाच्या संपर्कातील 3 जण विलगीकरणातील आहेत. भामरागड येथील एकजण पुर्वी मिळालेल्या बाधिताच्या संपर्कातील कामगार आहे. अंकिसा सिरोंचा येथील एकजण वारंगल येथून परतलेला व एक प्रतिबंधात्मक क्षेत्रातील महिला आहे. अहेरी येथील विलगीकरणातील रूग्णाच्या संपर्कातील 2 तर 5 जण तेलंगणा, चंद्रपूर व मुंबई येथून परतलेले प्रवासी आहेत. भेंडाळा चामोर्शी येथील नागपूरला उपचारासाठी गेलेली महिला कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. धानोरा येथील 6 सीआरपीएफ जवानांसह एक रूग्णाच्या संपर्कातील व्यक्ती बाधित आढळून आला आहे. आरमोरी तालुक्यातील एक प्रवासी बाधित अढळला आहे. कोरची येथील एक मार्कटमधील महिला व इतर एकजण रूग्णाच्या संपर्कातील कोरोना बाधित आढळला आहे. अशा प्रकारे नवीन 24 बाधित आढळून आले.
 
 
दिलासादायक म्हणजे आज पुन्हा नवीन 18 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यामध्ये भामरागड 1, आरमोरी 6, गडचिरोली 8 व एटापल्ली तालुक्यातील 3 जणांचा समावेश आहे.