भारतीयांना २०२१ मध्ये मिळणार ई-पासपोर्ट

    दिनांक :13-Aug-2020
|
नवी दिल्ली,
भारतीय नागरिकांना 2021 पासून ई-पासपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. याकरता लागणारे योग्य आयटी इन्फ्रास्ट्रक्चर असणारी एजन्सी निडवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या भारतीय नागरिकांना जे पासपोर्ट देण्यात येतात ते बुकलेटवर प्रिंट केलेले असतात. भारताने एकूण 20000 अधिकृत आणि डिप्लोमॅटिक ई-पासपोर्ट ट्रायल बेसिसवर इश्यू केले आहेत. ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मायक्रोप्रोसेसर चीप आहे. त्यामुळे 2021 मध्ये नवीन पासपोर्ट किंवा रिन्यू पासपोर्ट हे ई-पासपोर्ट असण्याची शक्यता आहे.
 
 
epassport_1  H
 
भारतातील लोकसंख्येचा विचार करता ई-पासपोर्टची प्रक्रिया बरीच मोठी ठरू शकते. त्यामुळे केंद्राला अशा कंपनीचा शोध आहे, ज्यांच्याकडे योग्य आयटी इन्फ्रास्ट्रक्चर असेल. हे पासपोर्ट इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन (International Civil Aviation Organization ICAO) च्या प्रमाणांवर आधारित असतील. ई-पासपोर्ट लागू झाल्यास बनावट पासपोर्ट बनवणे कठीण होईल आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणावेळी इमिग्रेशनची प्रक्रिया देखील सोपी होईल. सध्या भारतात बनणाऱ्या प्रिंटेड पासपोर्टचे बनावटीकरण खूप सोपे आहे.
या मीडिया अहवालानुसार भारत सरकार ई-पासपोर्ट बनवण्यासाठी इंफ्रास्ट्रक्चरची व्यवस्था करत आहे. यासाठी निवडण्यात आलेल्या एजन्सीला दर तासाला 10000 ते 20000 ई-पासपोर्ट जारी करावे लागतील. याप्रकारच्या एजन्सी चेन्नई आणि दिल्लीमध्ये बनवण्यात येणार आहेत. भारत सरकारचे नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटर आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय याबाबत विचार करत आहे. आयटी इन्फ्रास्ट्रक्चर आणि सोल्युशन उपलब्ध करून देणाऱ्या एजन्सी निवडण्यासाठी रिक्वेस्ट फॉर प्रोपोजल जारी करण्यात आले आहे. यानंतर भारतातील 36 पासपोर्ट ऑफिस ई-पासपोर्ट ही जारी करु शकतील.
अहवालानुसार ई-पासपोर्टमुळे पासपोर्ट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सद्यस्थितीपेक्षा 10 पटीने अधिक जलद होईल. यामध्ये काही चांगले फीचर देखील असणार आहेत. ई-पासपोर्टमध्ये ऍडव्हान्स सिक्युरिटी फिचर दिले जाणार आहे. पासपोर्ट बनवण्याच्या प्रक्रियेत होणारी फसवणूक, बनावट पासपोर्टमध्ये होणारी वाढ टाळण्यासाठी सरकार हा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. त्यामुळे भारतीयांना लवकरत ई-पासपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.