राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे १०वी व १२वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

    दिनांक :13-Aug-2020
|
- जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग यांचा स्तुत्य उपक्रम
हिंगणा,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या सत्र 2019-2020 च्या दहावीच्या व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा हिंगणा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा परिषद सदस्य दिनेश रमेशचंद्र बंग यांच्या पुढाकाराने सत्कार करण्यात आला.
 
satkar_1  H x W 
 
येथील स्वर्गीय देवकी बाई बंग विद्यालयात 50 विद्यार्थी बोलवून कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सामाजिक अंतर ठेवत एका छोटेखानी कार्यक्रमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी तालुक्यातील दहावी बारावीतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सत्कार करण्यात आला. हिंगणा तालुक्यातील सर्व शाळेतील अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, अभिनंदन पत्र, आणि सॅनिटायझर व मास्क देऊन सत्कार करण्यात आला.
 
 
यावेळी अध्यक्षस्थानी माजी मंत्री रमेशचंद्र बंग, प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती उज्वला बोंढारे, पंचायत समिती सभापती बबनराव अव्हाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे, पंचायत समिती सदस्य सुनील बोंदाडे पौर्णिमा दीक्षित, महिला राकापा तालुकाध्यक्ष सुरेखा फुलकर, युवक राकापा तालुकाध्य आशिष पुंड, विध्यार्थी राकापा तालुकाध्यक्ष राहुल किन्हेकर, सरपंच प्रेमलाल भलावी, सुशील दीक्षित, प्रमोद फुलकर, सुरेश वसू, प्राचार्य नितीन तुपेकर, शशिकांत मोहिते,चंद्रशेखर मांडवकर आदी उपस्थित होते.