सगुणा कंपनी ठरली कोरोनाचा हॉटस्पॉट!

    दिनांक :13-Aug-2020
|
- जिल्ह्यात एकाच दिवशी 30 रुग्ण
तभा वृत्तसेवा
वर्धा/हिंगणघाट,
जिल्ह्यात दररोज कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. जिल्ह्यात आज 13 रोजी कोरोनाचे 30 रुग्ण आढळून आले आहेत. हिंगणघाट तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील वणी येथील सगुणा कंपनीतील 12 कर्मचारी अन्ंटीजन टेस्टमधे कोरोनाबाधीत असल्याचे आढळल्याने हिंगणघाट शहरासह तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे. यासोबतच शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेली महिला रुग्णसुद्धा कोरोनाबाधीत झाली असून सेवाग्राम येथे उपचार घेत आहे. 7 रोजी सुगुणा कंपनीतील कर्मचारी एक रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याच्या अहवाल प्राप्त झाला होता. तो हिंगणघाट येथील रहिवासी आहे. उपरोक्त पार्श्वभूमीवरच सगुणा कंपनीतील पुन्हा दोन्ही रुग्णाची तपासणी केल्यानंतर 2 रुग्ण कोरोना बाधीत आढळले होते.
 
 
saguna_1  H x W
 
पुन्हा आज त्यांच्या संपर्कातील 12 रुग्ण कोरोना बाधीत निघाल्याचे निष्पन्न झाले. आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयातच अंटीजन टेस्ट करण्यात आली. पुन्हा काही संशयित रुग्नांची तपासणी सुरुच आहे. या रुग्णाचा अवघ्या 5 किमी अंतरावर असलेल्या हिंगणघाट शहराशी जवळचा संपर्क आहे. प्रतिबंधित कारवाई करताना सदर सोयाबीन कंपनीतील काही विभागसुद्धा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
 
 
पुन्हा आज 30 कोरोना रुग्णांची भर
वसंतनगर दोन महिला तर दोन पुरुष, आर्वी तालुक्यातील रोहणा येथे एक पुरुष, जाम हिंगणघाट पुरुष, हिंगणघाट महिला, गिमा टेक्सटाईल्स छोटी वणी हिंगणघाट पुरुष , समुद्रपूर येथे तीन तर समुद्रपूर तालुक्यातील हळदगाव येथील एक पुरुष, पुलगाव येथील झाकीर हुसेन कॉलनीतील एक पुरुष, देवळी येथे दोन महिला, कारंजा तालुक्यातील सारवाडी येथील एक पुरुष कोरोनाबाधित आढळून आले. तर हिंगणघाट येथील सगुणा कंपनीत 12 रुग्ण आढळून आले आहेत.