संजयच्या प्रकृतीसाठी अभिनेत्रीचे गणपतीला साकडे

    दिनांक :13-Aug-2020
|
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे. त्याला चौथ्या टप्प्यातील कर्करोग झाल्याचे  रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. परिणामी संजय दत्त आता उपचारासाठी परदेशात जाणार आहे. दरम्यान संजयने कर्करोगावर मात करुन लवकरात लवकर बरे  व्हावे  यासाठी अभिनेत्री काम्या पंजाबी हिने प्रार्थना केली आहे. संजू बाबा पूर्णपणे बरा होईपर्यंत अखंड ज्योत पेटवेन असा निर्धार तिने केला आहे.
 

Kamya Punjabi-Sanju Baba_
“मी गणपती बाप्पाकडे तुमच्यासाठी प्रार्थना करतेय. मी बाबासाठी अखंड ज्योत पेटवेन. मला खात्री आहे तूम्ही लवकरच बरे व्हाल. १० वर्षांची असल्यापासून मी तुमची फॅन आहे. मी तुम्हाला मेहबूब स्टुडिओमध्ये भेटले होते. त्यावेळी तुम्ही मला झिप्पो भेट म्हणून दिले  होते . मी तिच क्रेझी गर्ल आहे.” अशा आशयाचे  ट्विट काम्या पंजाबीने केले  आहे.
 
कर्करोगाचे  निदान झाल्यानंतर संजय लवकरच उपचारांसाठी विदेशात जाणार असल्याचे  म्हटले  जात आहे. काही दिवसांपूर्वीच संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले  होते. मात्र दोन दिवसांतच त्याला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर आता त्याला चौथ्या टप्प्यातील कर्करोग असल्याचे  निदान झाले  आहे. दरम्यान, संजयला कर्करोगाचे  निदान झाल्यानंतर चाहत्यांमध्ये चिंतेचे  वातावरण पसरले  असून अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चिंता व्यक्त केली आहे. तसेच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीदेखील तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे.