सिया देवधर विचिटा हूप्ससाठी खेळणार

    दिनांक :13-Aug-2020
|
- लाईफ प्रेप अकादमी कडून मिळाली ऑफर
नागपूर,
शिवाजीनगर जिमखानाची प्रतिभावान बास्केटबॉल खेळाडू सिया देवधरने युएसएच्या विचिटा, लाइफ प्रेप अकाडमी कडून बास्केटबॉल खेळण्यास संमती दर्शविली आहे. सिया अमेरिकेच्या विश्वस्तरीय सुविधांनी युक्त क्लब विचिटा हूप्ससाठी खेळणार असून यांच्याकडे १२ बास्केटबॉल कोर्ट आहे. लाइफ प्रेप अकादमीचे मुख्य प्रशिक्षक जेफ हेनरी आणि एनबीए अकादमीच्या ग्लोबल संचालक ब्लेयर हार्डीकने सिया ही ऑफर दिली होती.
 
siya_1  H x W:  
 
१७ वर्षीय सियाने आतापर्यंत (मे २०१८, जानेवारी २०१९, ऑक्टोंबर २०१९) या ३ एनबीए अकादमी इंडिया महिला शिबीरात भाग घेणाऱ्या तीन मुलींपैकी एक आहे. याव्यतिरिक्त प्रत्येक शिबीरात पुरस्कार प्राप्त करणारी सिया एकमात्र खेळाडू आहे. सहा वर्ष वयापासून सिया ही शिवाजीनगर जिमखान्यातील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक शत्रृघ्न गोखले व विनय चिकटे यांच्याकडून प्रशिक्षण घेते.