तिरोड्यात कोरोनाने दोन दिवसात तिघांचा मृत्यू

    दिनांक :13-Aug-2020
|
तभा वृत्तसेवा
तिरोडा,
तालुक्यात कोरोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच आहे. तालुक्यात कोरोनाने दोन दिवसात तिघांचा मृत्यू झाला असून या प्रकारला प्रशासनचा ढिसाळ व दुर्लक्षितपणा कारभूत असल्याचा आरोप जनतेमधून होत आहे.
 
gondiya_1  H x  
 
तालुक्यातील पाटीलटोला/मुंडीकोटा येथील सुभाष नारायण तिडके (६५) व खोडगाव/बिरसी येथील हेमंत नागपुरे (५५) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सांगीतले जात आहे. दोन दिवसांपुर्वी नागपूरे यांचा अहवाल नकारात्मक आल्याचे आरोग्य विभाग दोन सांगत आहे. नागपूरेंची प्रकृति खालावल्याने त्यांना सरांडी कोव्हीड केअर केंद्रातुन येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यानंतर खाजगी रुग्णालयात व नंतर गोंदिया येथील केटीएस जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान नागपूरे यांचा मंगळवारी मृत्यू झाला. मृत्यूनतंर नागपूरेंचा कारोना अहवाल सकारात्मक आल्याचे सांगितले जाते. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णांच्या जिवाशी खेळने सुरु केले आहे. पहिला अहवाल नकारात्मक व दोनच दिवसात मृत्यूनंतरचा अहवाल कसा सकारात्मक येतो? असा प्रश्न नागरिक उपस्थित करित आहेत. हेमंत नागपुरे यांची राख थंड होत नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगा मंगेश नागपुरे (३०) याचाही मुत्यु झाला. त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला हे अद्याापही स्पष्ट झालेले नाही. हेमंत यांची पत्नीही आजारी असल्याचे सांगीतले जाते. गोंडमोहाडी येथील राजु चौंडलवार (३५) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नागपूरला हलविले. तेथे त्यांचा आज मृत्यू झाल्याची माहिती आहे. राजु यांच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.
 
 
सरांडी येथील कोव्हीड केअर केंद्र तिरोडा उपजिल्हा रुग्णालयचे अधीक्षक डॉ. हिम्मत मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली असून अलगीकरणात असलेल्या रुग्णांना वाèयावर टाकण्यात आले आहे. येथे आरोग्य कर्मचारी उपस्थित राहत नाही. येथे ताप, सर्दी, खोकला असल्याचे संगूनही त्याना साधी औषध मिळत नसल्याने रुग्ण हवालदिल झाले आहेत. या प्रकाराने रुग्णांमध्ये भिंती निर्माण झाली आहे. रुग्णांना गरम पाणी, नस्ता मिळत नाही, लहान मुलांसाठी दुध, बिस्किटे उपलब्ध करून दिले जात नसल्याची रुग्णाची ओरड आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे रुग्णांचे म्हणने आहे. या प्रकाराकडे जनप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.