अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या दोन नराधमांना फाशी

    दिनांक :13-Aug-2020
|
- 55 वर्षानंतर फाशीच्या शिक्षेची दुसरी घटना
- चिखली पोलिस स्टेशनवर विद्युत रोषणाई
बुलडाणा,
आईच्या कुशीत झोपलेल्या नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीस उचलून तिच्यावर आळीपाईने पाशवी अत्याचार करणार्‍या चिखली येथील दोन आरोपींना विशेष जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीच्या शिक्षासह विविध कलमा अंतर्गत सुनावणी आहे.या शिक्षेने सर्व सामान्य लोकांनी न्याय देवतेवर विश्वास निर्माण झाला असून बुलडाणा जिल्हा न्यायालयातील 55 वर्षानंतर फाशीची शिक्षा सुनावण्याची दुसरी घटना आहे. चिखली पोलिसांनी निकालाच्या स्वागतासाठी पोलिस स्टेशनवर विद्युत रोषणाई केली होती. तसेच विविध पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केेले आहे.
 
 
policebul_1  H
 
26 एप्रिल 2019 रोजी रात्री नऊच्या सुमारास चिखली शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत आपल्या आई-वडिलांसह झोपलेल्या नऊ वर्षीय चिमुकलीला उचलून नेऊन तिच्यावर दोन नराधमानी पाशवी अत्याचार करण्यात आले होते. रात्री पेट्रोलिंगवर असणार्‍या पोलिसांना ती चिमुकली जखमी अवस्थेत दिसून आल्यावर प्रकार समोर आला. या घटनेनंतर चिखली शहर एकत्रित येऊन आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करत होते. एक दिवस चिखली बंद पुकारण्यात आला होता. या घटनेने राज्यभर खळबळ उडाली होती.
 
 
 
या निंदणीय घटनेचा तपास अत्यंत गंभीरतेने करीत चिखली पोलीसांनी अल्पकालावधीतच आरोपीला फाशीची शिक्षा मिळविली. त्यामुळे चिखली पोलीसांनी देखील काल दि. 12 ऑगस्टं रोजी पोलीस स्टेशनवर विदयुत रोषनाई केली होती. या प्रकरणात पोलिसांनी लगेच कारवाई करून निखिल गोलाईत व सागर बोरकर या आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यानंतर आज पर्यंत विविध साक्षी पुरावे तपासून आज जिल्हा न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश श्रीमती चित्रा हंकारे यांच्या न्यायालयाने विविध कलमांव्नये दोषी ठरवले असून, या निकालाने चिखली पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठ कामगिरीवरही शिक्कामोर्तब झाले आहे. या प्रकरणी फिर्यादी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ड वसंत भटकर , सोनाली सावजी - देशपांडे यांनी सरकारी बाजुचा पक्ष मांडला. प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय अधिकारी महामुनी यांच्या मार्गदर्शनामध्ये ठाणेदार गुलाबराव वाघ , शरद गिरी , ज्योती मुळे , सुनिल पवार यांच्या सह अनेकांनी परिश्रम घेतले.