शांतीनगरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून युवकाची हत्त्या

    दिनांक :13-Aug-2020
|
तभा वृत्तसेवा
वर्धा,
नजिकच्या शांतीनगर येथे रक्षाबंधनाकरिता मित्राबरोबर आलेल्या महिलेच्या मित्राचा महिलेच्या पतीने कैलास ढुमणे (28) रा. मोहा जिल्हा यवतमाळ याचा दगडाने ठेचुन खुन केला. ही घटना काल बुधवार 12 रोजीच्या मध्यरात्री 12.30 वाजताच्या सुमारास शांतीनगर परिसरात घडली. या प्रकरणी रामनगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल केला असुन विलास उर्फ बाल्या कासार (40) रा. कळंब जि. यवतमाळ याचा शोध घेतला जात आहे.
 
 
shanti_1  H x W
 
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार कैलास ढुमणे सोबत विलास कासारची पत्नी यवतमाळ येथून शांतीनगर येथे मानलेल्या भावाला राखी बांधण्यासाठी पाच सहा दिवसांपुर्वी आले होते. त्यानंतर विलास कासार येथे आला. काल बुधवार 12 रोजी सायंकाळी 6.30 वाजताच्या दरम्यान कैलास ढुमणे, विलास कासार त्याची पत्नी, छोटी मुलगी धोत्रा येथे बहिणीच्या घरी पायदळ जायला निघाले. पाऊस वाढल्याने ते शांतीनगर परिसरात असलेल्या डेहनकर यांच्या ढाब्याजवळ थांबले. पाऊस थांबत नसल्याने तेथेच हॉटेलमध्ये जेवण करुन जवळ असलेल्या शेखर मोटरच्या शेडमध्येच झोपले.
 
 
 
रात्री 12.30 च्या दरम्यान विलास कासार याने झोपलेल्या कैलासला दगडाने ठेचुन काढले. घटनेची माहिती नरेंद्र डेहनकर यांनी रामनगर पोलिसांना दिली. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप, रामनगर पोलिस स्टेशन चे ठाणेदार धनाजी जळक, महेश इटकर, श्‍वान पथक घटनास्थळी दाखल झाले. कैलासला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनास्थळावरुन खुन करण्यात आलेले दगडं जप्त करण्यात आला. या प्रकरणी विलास कासार याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन रामनगर पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
 
विलास कासार व कैलास ढुमने यांची ओळख काही वर्षांपुर्वी विटभट्टीवर झाली. त्यातुनच कैलास ढुमणे बरोबर विलासच्या पत्नीचे सुत जुळले. अशात मानलेल्या भावाला राखी बांधण्यासाठी मित्र कैलास बरोबर विलासची पत्नी आली होती. अनैतिक संबधाच्या संशयावरुन डोक्यात राग घातलेल्या विलासने कैलासचा खुन केल्याची माहिती पोलिसांनी दिली.