कोठी येथे जवानांवर नक्षल्यांचा हल्ला; एक जवान शहीद

    दिनांक :14-Aug-2020
|
- एक जखमी
गडचिरोली,
भामरागड उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयांतर्गत येत असलेल्या कोठी पोलिस मदत केंद्रातील पोलिस जवानांवर नक्षल्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक पोलिस जवान शहीद झाला असून दुसरा जवान जखमी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
dushant nandeshwar_1  
 
दुशांत नंदेश्वर असे शहीद जवानाचे नाव आहे. तर, दिनेश भोसले नामक जवान जखमी झाल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार, दोन्ही जवान कोठी गावात किराणा सामान आणण्यासाठी गेले होते. दरम्यान, नक्षल्यांनी दोन्ही जवानांवर हल्ला केला. यामध्ये दुशांत नंदेश्वर हे शहीद झाल्याचे सुत्रांनी म्हटले आहे.