स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

    दिनांक :14-Aug-2020
|
- जिजामाता राष्ट्रीय संस्कार प्रतिष्ठानचा उपक्रम
चिखली,
जिजामाता राष्ट्रीय संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्यदिना निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन शनिवार, 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत समर्पण, संघ कार्यालय, गांधीनगर, चिखली येथे करण्यात आले आहे.
 
blood donation_1 &nb 
 
कोरोना प्रादुर्भावामुळे टाळेबंदी सुरू आहे. टाळेबंदित रक्तदान शिबिर आयोजनची संख्या कमी झाल्याने विविध रक्तपेढ्यामध्ये रक्ताची चणचण असून रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गरजू रुग्णांना दिलासा मिळावा, त्यांना रक्ताची अडचण भासू नये, या हेतूने स्वातंत्र्यदिना निमित्ताने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन जिजामाता राष्ट्रीय संस्कार प्रतिष्ठानच्या संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.