राम-भावनेचा उद्घोष!

    दिनांक :02-Aug-2020
|
- हितेश शंकर
व्याकरणानुसार कुठल्याही जात, द्रव्य, गुण, भाव, व्यक्ती, स्थान अथवा क्रिया इत्यादींच्या नावाला नाम म्हणतात. आता या कसोटीवर अयोध्येला ठेवा. अयोध्या! हे केवळ नाम नाही. केवळ शब्द नाही. अयोध्या या राष्ट्राचा श्वास, त्याचा प्राण आहे.
 

Ram-3_1  H x W: 
 
ज्यांना या देशाचे, त्याच्या एकतेचे भय वाटत होते, त्यांनी ‘अ-युध्य’- अयोध्येला युद्धाचे मैदान, लोकांच्या मनाला विभाजित करणारा मुद्दा बनविला. जे बाहेरून आले, त्यांच्यासाठी लोकांना कापणे, जनमानसाला विभाजित करणे, हा रणनीतिक खेळ अथवा म्हणायचे झाल्यास सत्तेला स्थायित्व देणारे सिमेंट होते. अन्यथा या देशाच्या समाजाचे मन तर रामामध्ये रमत होते.
 
 
जिथे मुस्लिम लोकसंख्या शून्य होती, तिथे या राष्ट्राला संवेदनहीन करण्यासाठी बाबरीची पाचर मारली गेली. समाज तळमळला. इतिहासकार किंनघमने लखनौ गॅझेटियरमध्ये लिहिले, ‘‘एक लाख चौर्‍याहत्तर हजार हिंदू  धारातिर्थी पडल्यानंतरच बाबरचा सेनापती मीर बाकी, मंदिराला तोफगोळ्यांनी पाडण्यात यशस्वी होऊ शकला.’’
 
 
काळ बदलत असतो, शासक बदलत असतात, राजकारण वेगवेगळी वळणे घेत असते, परंतु राष्ट्र राजकारणाच्या अक्षावर फिरत नाही, हे सत्य आहे. राष्ट्रचेतनेचा अश्वमेधी घोडा, तत्कालीन राजकारणाला त्याच्या मर्यादा दाखवित प्रत्येक काळात दौडत असतो. ‘कोउ नृप होय’च्या चालीवर... आपल्या ध्येयावर दृढ, अडथळे-परिवर्तनांपासून बेफिकीर... म्हणून, राज्ये बदलत गेलीत, परंतु या समाजाने गेल्या 500 वर्षांपासून शपथ घेऊन ठेवली होती- राम काजु कीन्हें बिनु मोहि कहां विश्राम!
 
 
श्रीरामजन्मभूमीवर पुन्हा मंदिर उभारण्यासाठी बाबरच्या काळात किमान अर्धा डझन युद्धे झालीत. हुमायूंच्या काळात किमान डझनभर, अकबराच्या काळात सुमारे दोन डझन आणि अतिक्रूर औरंगजेबच्या काळात सुमारे तीन डझन युद्धे, या देशाच्या समाजाने तत्कालीन शासनाविरुद्ध, या जन्मभूमीला परत तिचा मान प्राप्त करून देण्यासाठी लढली. स्वातंत्र्याच्या आंदोलनात, हिंदू -मुस्लिम समाजाच्या एकजूटतेने जेव्हा एकदा ब्रिटिश शासनाला मुळापासून हादरविले होते, त्याच्या मुळाशी रामनामच होते. याला नाकारता येणार नाही.
 
 
तेव्हा मुस्लिम नेते मौलाना अमीर अली यांनी मुसलमानांना खडसावत म्हटले होते, ‘‘वंशपरंपरागत वतन तसेच देशाचे स्वातंत्र्य कायम ठेवण्यासाठी, बायकांचे दागदागिने सुरक्षित राहण्यासाठी आणि आमचे प्राण व संपत्ती वाचविण्यासाठी आमच्या हिंदू  बांधवांनी इंग्रजांशी लढून जो पराक्रम दाखविला आहे, त्याला आम्ही विसरू शकत नाही. म्हणून अल्लाचा आदेश (फर्जे इलाही) आम्हाला बाध्य करतो की, हिंदूंचा खुदा- रामचंद्रजींच्या जन्मस्थानी जी बाबरी मशीद बनली आहे, ती आम्ही हिंदूंना स्वखुशीने सोपविली पाहिजे. कारण हिंदू-मुस्लिम एकतेला बाधा ठरणारे हेच सर्वात मोठे कारण आहे आणि असे करून आम्ही दूंचे हृदय िंजकू शकतो.’’
 
 
म्हणजे, या समाजाच्या मनाला जोडणारा राम हा एक सेतू आहे. ही बाब जशी अमीर अली यांच्या लक्षात आली, तशी ती इंग्रजांच्याही नजरेतून सुटली नाही. ‘फोडा आणि राज्य करा’चा पुढचा आघात याच एकतेवर घालण्यात आला. जन्मभूमीचा वाद समाप्त करण्यासाठी आवाज उठविणारे मौलाना अमीर अली व हनुमान गढीचे महंत बाबा रामचरण दास यांना इंग्रजांनी 18 मार्च 1858 ला अयोध्येत हजारो हिंदू-मुसलमानांसमोर कुबेर टिल्यावर फाशी दिली. या घटनेला नोंदविणारे इतिहासाकर मार्टिन यांनी लिहिले, ‘यानंतर फैजाबादच्या बंडखोरांची कंबर तुटली आणि संपूर्ण फैजाबाद जिल्ह्यात आमचा धाक प्रस्थापित झाला.’
 
 
जो वाद, आपल्या स्थार्थासाठी भारताला तुडविण्यासाठी आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीने सुटू दिला नाही, त्याला इंग्रजांचीच री ओढणार्‍या राजकारणाने स्वातंत्र्यानंतरही कायम ठेवला. समाज तोडणारे राज्य करीत राहिले आणि त्यांच्या आड भारताचे तुकडे करण्याचे स्वप्न पाहणार्‍या शक्ती देखील बलवान होत गेल्या. आता श्रद्धेवर लावण्यात आलेल्या अपमानरूपी अंकुशाला समाजाने धीराने, लोकशाही व्यवस्थेच्या चौकटीत राहून हटविले आहे. अशा वातावरणात काही जण, समाज आणि त्यात एकतेचा भाव जागृत करणार्‍या संस्थांबाबत शंकाकुशंका उत्पन्न करण्याचा प्रयत्न करू शकतात. आता जेव्हा मंदिराचे भूमिपूजन होत आहे तर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, या राष्ट्राची संकल्पना आणि हिंदुत्वावर आक्षेप तसेच विचारमंथनाचे नवे पर्व सुरू होईल. विचारले जाईल की, राममंदिराचे निर्माण म्हणजे संघाच्या हिंदुत्व ‘अजेंड्या’चे एक चक्र पूर्ण होणे आहे काय? िंकवा येथे पुन्हा एकदा हिंदुत्वाचे पर्व सुरू होणार का? हिंदुत्वाला डिवचणार्‍यांनी आधी ‘व्हाय आय अॅम नॉट ए हिंदू’ (मी हिंदू का नाही) सारखे पुस्तक लिहिले आणि पुढे गेले. परंतु या समाजाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. नंतर ‘व्हाय आय अॅम ए हिंदू’ (मी हिंदू का आहे) सारख्या पुस्तकाच्या माध्यमातून, हिंदुत्वामध्ये दोन प्रकारच्या विचारधारा आणि अंतर्गत गटबाजीची पटकथा लिहिण्याचा प्रयत्न केला गेला. त्याला ‘हिंदुत्व-2.0’ म्हटले गेले.
 
 
हिंदुत्वाला राजकारणाचे उपकरण मानणार्‍यांनी समजून घेतले पाहिजे की, या देशाचा समाज आता राजकीय चालबाजीला चांगलाच ओळखून चुकला आहे. हिंदुत्व या देशाच्या सांस्कृतिक स्वभाव आहे. याचा एखादा ‘अजेंडा’ म्हणून विचार करणे िंकवा याला तसे निरुपित करणे संकुचितपणा आहे. म्हणून राममंदिर भूमिपूजनाला, कुठल्या तरी‘अजेंड्या’चे चक्र पूर्ण होणेऐवजी, इतिहासात नोंदविलेला ‘मैलाचा दगड’ म्हणजे अधिक योग्य राहील.

 
हाही प्रश्न फेकला जाईल की, राममंदिर निर्माणानंतर आत संघासमोर कुठला मार्ग आहे? िंकवा संघ िंहदुत्वाच्या कथित ‘अजेंड्या’ला कसे पुढे नेईल? हा प्रश्न निराधार आहे. संघाला ओळखणारे असले प्रश्न विचारणार नाहीत. कारण त्यांना माहीत आहे की, या देशाचा समाज आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्या दोन वेगवेगळ्या मार्गांचे प्रवासी नाहीत. या समाजाचा जो मार्ग आहे तोच संघाचाही मार्ग आहे. श्रीराममंदिरासाठी एक-दोन वर्षे नाही, 500 वर्षांपासून भारतीय समाज आंदोलन करीत होता. संघाची स्थापना 1925 साली झाली आहे आणि हा प्रश्न शतकांपासून देशाच्या मनाला छळत होता. संतसमाज या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहे आणि संघ या समाजासोबत दृढपणे उभा राहिला. संघ आणि समाज पृथक आहेत, असे जे मानतात, त्यांना समाजाच्या इच्छा-आकांक्षांची अभिव्यक्ती संघाचा ‘अजेंडा’ वाटू शकतो. समाजविरोधी राजकारणाच्या हेतूला धारदार बनविणारा आणखी एक मुद्दा येणार्‍या काळात समोर येऊ शकतो की, िंहदूंच्या श्रद्धांच्या प्रतीकस्थानांच्या स्थापनेसोबत देशात कट्‌टरता वाढेल. अशा सर्व शंका पूर्णपणे चूक आणि वाईट हेतूंनीच पेरल्या गेल्या आहेत, हे समजून घेतले पाहिजे. खरे तर, िंहदुत्वामध्ये कट्‌टरतेला काही स्थानच नाही. मनुष्य सोडाज, ती तर जड-चेतन, सर्वांचा विचार करणारी, सर्वांमध्ये संतुलनाचा आग्रह करणारी संकल्पना आहे. सृष्टीतील सर्वांच्या भल्याच्या आग्रहाला-आवाहनाला तुम्ही कट्‌टरता म्हणू शकत नाही. अहल्या वा भिल्लामध्ये, वानर वा गिधाडामध्ये (जटायू), जामवंत वा नल-नीलमध्ये भेद न करणारे उदार व सत्यरक्षक प्रतीक, ज्या समाजाचे ‘मर्यादा’पथदर्शक असेल, तो समाज कट्‌टर होऊच कसा शकतो?
 
 
रामजन्मभूमी मंदिरासाठी ठेवली जाणारी वीट केवळ वीट नाही आहे. त्यात अन्यायाचा प्रतिकार, अयोग्य गोष्टींचा तिरस्कार आणि योग्य गोष्टींची प्रशंसा करणारा राष्ट्रबोध दडलेला आहे. मर्यादेत राहून, चुकीला दुरुस्त करण्याचा हा मार्ग या समाजाला त्याच्या रामानेच तर दाखविला आहे!