नागपूर,
योगा फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे ४ थी फेडरेशन कप लाईव्ह ऑनलाइन या स्पर्धेत महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय खेळाडू धनश्री लेकुरवाळेची निवड झाली आहे. धनश्री लेकुरवाळे ही वरिष्ठ गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.
४४ व्या वरिष्ठ राष्ट्रीय योगा स्पोट्र्स चॅम्पियनशिप, राजकीय इंजिनियरिंग कॉलेज, भांकरोटा, जयपूर येथे झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिपच्या आधारे झालेली आहे. तिने तिथे रजत पदक प्राप्त केले होते. या फेडरेशन कप मध्ये भारतातील प्रत्येक वयोगटातील अव्वल खेळाडूंची निवड केली जाते. प्रथमच कोरोनाच्या संकट काळात लाईव्ह ऑनलाइन फेडरेशन कपचे आयोजन करण्यात आले असून १५ ऑगस्टला या स्पर्धेचे उद्घाटन अशोककुमार अग्रवाल, डॉ. अनिल अग्रवाल व अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आत्तापर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या धनश्रीला स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी सर्व खेळाडूंच्या वतीने खेळाडू प्रमुख म्हणून शपथविधी घेण्याचा मान मिळाला. स्पर्धेत विविध राज्यातील अनेक खेळाडू सहभागी होणार असून स्पर्धा ३० ऑगस्ट पर्यंत वेगवेगळ्या वयोगटानुसार होणार आहे.