आयपीएलमुळे सर्व खेळांमध्ये सकारात्मकता येईल: बजरंग पुनिया

    दिनांक :22-Aug-2020
|
नवी दिल्ली, 
इंडियन प्रीमियर लीग सुरु झाल्याने जगभरातील सर्व तर्‍हेच्या क्रीडा प्रकारात सकारात्मकता येईल, असा विश्वास भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया याने व्यक्त केला आहे.
 
puniya_1  H x W
जर संयुक्त अरब अमिरातमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करत आयपीएलचे आयोजन होऊ शकते, तर अन्य खेळांच्या स्पर्धा सुरु करण्याचाही विचार केला जाऊ शकतो, असेही तो म्हणाला.
 
खेळाडूंसह सर्वांच्या आरोग्याची सुरक्षा अतिशय महत्त्वाची आहे. जर संयुक्त अरब अमिरातमध्ये कोरोनाबाबत कुठल्याही वाईट बातमीविना आयपीएल सुरळीतपणे पार पडली, तर भविष्यात अन्य क्रीडा संघटकसुद्धा क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबतचा विचार करु शकतात, असे मत बजरंगने व्यक्त केले.