कॅलिस अब्बास लिसा स्थलेकर यांना आयसीसी सन्मान

    दिनांक :23-Aug-2020
|
दुबई, 
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू जॅक्वेस कॅलिस, पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज झहीर अब्बास आणि पुण्यात जन्मलेली ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची कर्णधार लिसा स्थलेकर यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा हॉल ऑफ फेम प्रदान करण्यात आला आहे.कॅलिस हा जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असून त्याने 1995 ते 2014 या काळात दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करताना 166 कसोटी, 328 वन-डे व 25 टी-20 सामने खेळले आहेत. 44 वर्षीय कॅलिसने कसोटी व वन-डेमध्ये अनुक्रमे 13,289 व 11,579 अशा सर्वाधिक धावा काढल्या आहेत. वेगवान गोलंदाज म्हणून त्याने कसोटीत 292 व वन-डेमध्ये 273 बळींची नोंद केली आहे.
 

Jacques Kallis, Zaheer Ab 
 
तो दिग्गज आहे. हा शब्द त्याच्यासाठी तंतोतंत बसतो, अशा शब्दात गावस्करने कॅलिसची प्रशंसा केली. हॉल ऑफ फेममध्ये आणखी एका ‘कर’ ची भर पडली, अशा शब्दात गावस्करने महिला क्रिकेटपटू लिसा स्थलेकर हिचे कौतुक केले. लिसाने ऑस्ट्रेलियासाठी 8 कसोटी, 125 वन-डे व 54 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. अब्बास हा माझा मित्र आहे. तो नेहमी धावांसाठी भुकेला असायचा, असे गावस्कर म्हणाला. अब्बासने पाकिस्तानसाठी 78 कसोटी व 63 वन-डे सामने खेळले आहेत.