कोहलीचा भारतीय कसोटी संघ सर्वोत्तम : गावस्कर

    दिनांक :23-Aug-2020
|
नवी दिल्ली, 
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील विद्यमान भारतीय कसोटी क्रिकेट संघ हा आतापर्यंतचा सर्वोत्तम संघ आहे, अशा शब्दात भारताचा दिग्गज फलंदाज सुनील गावस्करने कौतुक केले आहे. यापूर्वीच्या भारतीय संघापेक्षा विद्यमान संघ हा आक्रमक गोलंदाजीसह संतुलित आहे, असेही तो म्हणाला.
 

virat and shunil_1 & 
 
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले असून सध्या जागतिक कसोटी अिंजक्यपद स्पर्धेच्या तालिकेतही भारत प्रथम क्रमांकावर आहे. इंडिया टूडेतर्फे आभासी माध्यमाव्दारे आयोजित प्रेरणादायी मालिकेत 71 वर्षीय गावस्कर बोलत होता.
 
 
संतुलन, क्षमता, कौशल्य आणि लढाऊवृत्तीच्या दृष्टीने हा आतापर्यंतचा भारताचा सर्वोत्तम संघ आहे, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. विद्यमान संघात वैविध्यपूर्ण आक्रमक गोलंदाजांची फळी आहे, जी जगात कुठेही आणि कुठल्याही परिस्थितीत भारताला सामना िंजकून देऊ शकते. हीच बाब भारतीय संघासाठी आवश्यक आहे, असेही तो म्हणाला.
 
 
भारताकडे कुशल फलंदाज व फिरकी गोलंदाज होते, परंतु अलिकडच्या काळात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, उमेश यादव व भुवनेश्वर कुमारसारखे जागतिक दर्जाचे वेगवान गोलंदाज पुढे आल्यामुळे भारतीय संघ जगातील सर्वोत्तम संघ बनला आहे, असे तो म्हणाला. विद्यमान भारतीय कसोटी क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघापेक्षा अधिक धावा काढून आयसीसी कसोटी मानांकनात अव्वल स्थान पटकावले आहे. यापुढेही भारताने ऑस्ट्रेलियापेक्षा अधिक धावा काढाव्या, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.