सुनैना फौजदार 'अंजली भाभी'ची भूमिका साकारणार

    दिनांक :24-Aug-2020
|
मुंबई :
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे  शूटिंग लॉकडाऊन काळात बंद होते. आता शूटिंगसाठी परवानगी देण्यात आल्यानंतर नवीन एपिसोड सुरु झाले आहेत. मात्र यादरम्यान 12 वर्षांपासून या शोचा भाग असलेली अभिनेत्री नेहा मेहता अर्थात 'अंजली भाभी' हा शो सोडणार असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी याच मालिकेतील 'रोशन सिंह सोढी' ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या गुरुचरण सिंह यांनी शो सोडल्यानंतर आता मालिकेतून आणखी एका लोकप्रिय कलाकाराची एक्झिट होत आहे.

taarakmehta ka ooltah cha
 
मिळालेल्या माहितीनुसार, नेहा मेहता 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा शो दुसऱ्या प्रोजेक्टसाठी सोडत असल्याची माहिती आहे. तसेच नेहा मेहताच्या जागी अभिनेत्री सुनैना फौजदार 'अंजली भाभी'ची भूमिका साकारणार असल्याची चर्चा असून शोसाठी रविवारपासून शूटिंग सुरु केल्याचेही बोलले  जात आहे.
पुढील एपिसोडमध्ये'अंजली भाभी'च्या भूमिकेत दिसणाऱ्या सुनैनाने संतान, लेफ्ट राईट लेफ्ट, लागी तुझसे लगन, कुबूल है, एक रिश्ता साझेदारी का, बेलन वाली बहू यांसारख्या शोमध्ये काम केले आहे.
 
 
दुसरीकडे 'रोशन सिंह सोढी' ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या गुरुचरण सिंहनेही शो सोडल्यानंतर आता त्या जागी अभिनेता बलविंदर सिंह सुरी 'सोढी'ची भूमिका साकारणार आहे. बलविंदर सिंह सुरीने दिल तो पागल है, धमाल, साजन चले ससुराल, लोफर यांसारख्या चित्रपटात काम केले  आहे.