आजचे राशिभविष्य दि. २५ ऑगस्ट २०२०

    दिनांक :25-Aug-2020
|
 
rasi bhavishya_1 &nb
मेष : कागदोपत्री व्यवहारांवर लक्ष द्या. काही महत्त्वाच्या कामांचा तुम्हाला फायदा होणार आहे. पर्यटनासाठीचा बेत आखला जाऊ शकतो.
 
वृषभ : दैनंदिन कामाचा व्याप वाढलेला असेल. धैर्याने पुढे जा. पुढे जाण्यासाठी तुम्हाला नवे  काहीतरी शिकावे  लागणार आहे. आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन : एखाद्या जुन्या कामाचा तुम्हाला फायदा होणार आहे. मेहनत करा. नवे  काम हाती घेण्याचा विचार करा. अविवाहितांना विवाहप्रस्ताव येतील.
कर्क : आज काही नव्या व्यक्तींच्या संपर्कात याल. करिअरच्या दृष्टीने  जास्त विचार करा. नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. अनेकांची मदत तुम्हाला मिळणार आहे.

सिंह : काही अशा घटना घडतील ज्याचा तुम्हाला येणाऱ्या काळात फायदा होणार आहे. समजुतदारपणे निर्णय घ्या. कामाच्या ठिकाणी नव्या ओळखी होतील.
कन्या : कोणत्यातरी गुंतवणूकीबाबत विचार कराल. धनालाभ होण्याची दाट शक्यता आहे. गणेशोत्सवाच्या या मंगल पर्वाचा तुम्हाला फायदा होणार आहे. दिवस चांगला आहे.
 
तुळ : आजच्या दिवशी जे विचार कराल ती कामे  पूर्णत्वास न्याल. महत्त्वाकांक्षा वाढलेली असेल. नोकरीच्या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती उदभवू शकते.
 
 
वृश्चिक : एखाद्या गोष्टीबाबत असणारा ताण दूर होईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. मेहनत करा. समजुतदारपणे निर्णय घ्या. संकटांवर मात कराल.
 

धनु : कामाच्या बाबतीत काही नव्या कल्पनांची अंमलबजावणी करण्याचा विचार कराल. आर्थिक चणचण मिटेल. मित्रांमुळे अनेक अडचणींवर मात करु शकाल.
 
मकर : धनलाभ होण्याचा योग आहे. ज्याचा फायदा प्रदीर्घ काळासाठी होणार आहे. मित्रांची मदत मिळणार आहे. बेरोजगारांना आज नोकरीची संधी मिळणार आहे.
 
कुंभ : जबाबदारी वाढेल. दिवसभर व्यग्र असाल. व्यापाराच्या बाबतीत समजुतदारपणे निर्णय घ्याल. नोकरीच्या ठिकाणी शांततेचे  वातावरण असेल.
 
मीन : जुने व्याप दूर होतील. सक्रियता वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. अचानक एखाद्या गोष्टीबाबत बेत आखाल. गणरायाच्या आशीर्वादानं सर्वकाही सुरळीत होणार आहे.