पूर्व विदर्भातील प्रकल्प 76 टक्के भरले

    दिनांक :25-Aug-2020
|
असोलामेंढा, दिना, बोर, धाम शंभर टक्के भरले
नागपूर, 
यंदा सतत बरसणार्‍या पावसामुळे पूर्व विदर्भातील असोलामेंढा, दिना, बोर, धाम हे सिंचन प्रकल्प 100 टक्के भरले असून, विभागातील 18 मोठ्या धरणात सरासरी 76 टक्के पाणीसाठा आहे.
  
gosikhurd_1  H
पावसाळ्याच्या अंतिम टप्प्यात बरसणार्‍या पावसामुळे सिंचन प्रकल्पांच्या जलपातळीत चांगलीच वाढ झाली असून, नागपूर विभागातील बहुतांश मोठे प्रकल्प काठोकाठ म्हणजे 80 टक्के भरले आहेत. राज्यात एकूण 84 मोठे प्रकल्प आहेत. त्यात नागपूर विभागात 18 आहेत. त्यापैकी असोलामेंढा, दिना, बोर, धाम ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. विभागातील प्रकल्प 76.91 टक्के भरले आहेत. जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्प 95.3 टक्के, पेंच प्रकल्प 94.72 टक्के, निम्न वेणा (नांद) 63.65 टक्के, वडगाव 84.43 टक्के भरला आहे. मध्यतंरी तोतलाडोह प्रकल्पाचे 14 ही दार उघडून पाण्याचे विसर्जन करण्यात आले.
 
रामटेक खिंडसी 37.94, इटियाडोह 72.23 टक्के, सिरपूर धरणात 74.65 टक्के, पुजारी टोला 82.66 टक्के, कालीसागर 73.26 टक्के, बोर 85.37, पोथरा 69.21 टक्के, लोअर वर्धा 86.81 टक्के, बावनथडी 68.09 टक्के, धापेवाडा बॅरेज टप्पा 2 8.22 टक्के जलसाठा आहे. वडगाव आणि गोसीखुर्द धरणाचे गेट उघडे करून पाण्याचे विसर्जन करण्यात आले. याशिवाय गोसीखुर्द प्रकल्पातून कालव्याच्या माध्यमातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले.
 
नागपूर विभागात 40 मध्यम प्रकल्प असून, त्यातील जलसाठा हा 79.08 टक्के आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची सततधार सुरू आहे. पूर्व विदर्भात पावसाचा जोर आहे. नागपूर शहरातही त्याची कधी रिपरिप तर कधी जोरदार हजेरी अनुभवायला मिळत आहे. धरणातून सोडण्यात येणार्‍या पाण्यामुळे नद्याही दुथडी भरून वाहत आहेत. यंदा पावस वेळेवर आला. मात्र, मध्यतंरी पावसाने दडी मारली होती. त्यामुळे खरीप पिकांना धोका निर्माण झाला होता. मात्र टप्प्याटप्प्याने तो बरसला व त्यामुळे तूट भरून निघाली. पण शेतीला गरज होती तेव्हा पाठ फिरविल्याने पिकांना फटका बसला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला.

मोठे प्रकल्पात असा आहे पाणीसाठा
प्रकल्प क्षमता (दलघमी) पाणीसाठी टक्केवारी
तोतलाडोह 1016.88 966.35 95.03
कामठी खैरी 141.98 134.48 94.72
रामटेक खिंडसी 103 39.08 37.94
लोवर नांद वणा 53.18 33.85 63.65
वडगाव 134.89 108.50 80.43
इटियाडोह 317.87 229.59 72.23
सिरपूर 160 119.44 74.65
पुजारी टोला 43.53 35.98 82.66
कालीसरार 26.04 19.08 73.26
असोलामेंढा 52.33 52.33 100
दिना 67.57 67.57 100
बोर 123 105.01 85.37
धाम 59.49 59.49 100
पोथरा 34.72 24.03 69.21
लोअर वर्धा 216.87 188.27 86.81
गोसीखुर्द 740.17 397.83 53.75
बावनथडी 217.32 147.98 68.09
धापेवाडा बॅरेज 2 44.05 3.62 8.22
एकूण 18 प्रकल्प 3552.89 2732.47 76.91