राज्यात 16 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

    दिनांक :26-Aug-2020
|
* मुंडे एमजीपीत तर बी राधाकृष्णन नागपुर मनपा आयुक्त
तभा वृत्तसेवा
मुंबई,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 16 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या(Transfers of 16 IAS officers) केल्या असून,  आपल्या कार्यपद्धतीने राज्यभरात प्रसिद्ध असलेले तुकाराम मुंडे(tukaram mundhe) यांची नागपुर मनपा आयुक्त पदावरून उचलबांगड़ी करण्यात आली आहे. त्यांना सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण(secretary maharashtra jeevan pradhikaran) या ठिकाणी पाठविण्या आले असून, बी राधाकृष्णन(b. radhakrushana) यांची नागपुर मनपा आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.

transfer_1  H x 
नागपुरमध्ये कोविडचा प्रसार अधिक होऊ लागल्याने मुंडे यांची बदली केली असल्याचे मानले जात आहे. त्यांच्या ठिकाणी राधाकृष्णन यांची नियुक्ती केली असून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले एस एम देशपांडे यांची सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव म्हणून तर या ठिकाणी असलेल्या अंशु सिन्हा यांची कौशल्या विभागाच्या सचिव पदी,लोकेश चंद्र यांची जलसंपदा विभागाच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 
परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांची महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी,अप्पासाहेब मीसाळ यांची कोकण विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. मेरीटाईम बोर्डचे सीईओ एन रामास्वामी यांची आयुक्त कुटुंब कल्याण या ठिकाणी नियुक्ती केली असून राष्ट्रिय ग्रामीण जीवोन्नती अभियनच्या सीईओ आर विमला यांना जल जीवन मिशनच्या अभियान संचालक म्हणून नियुक्ती दिली आहे.
 
डॉ नरेश गीते यांना व्यवस्थापकीय संचालक महानंद येथून महारष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या औरंगाबाद येथे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून तर अविनाश ढाकने राज्याच्या परिवहन आयुक्त पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.के व्ही जाधव सहमुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी यांना नाशिक मनपा आयुक्त, चंद्रकांत डांगे यांना भूजल सर्वेक्षण संचालक,दीपा मुधोळ यांना प्रकल्प व्यवस्थापक जलस्वराज्य प्रकल्प,अहमदनगर जिप सीईओ एस एस पाटील याना सहव्यवस्थापकीय संचालक सिडको तर रोहन घुगे यांची सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प संचालक चंद्रपुर येथे नियुक्ती केली आहे.